दोन वर्षांपासून बांधकाम पूर्ण होऊनही २९ घरकुलांचा निधी अप्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:38 AM2021-02-05T08:38:19+5:302021-02-05T08:38:19+5:30
करडी (पालोरा):- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भंडाराचे प्रकल्प संचालकांच्या दुर्लक्षाकडे दोन वर्षांपूर्वी बांधकामे पूर्ण झालेल्या २९ घरकुलांची देयके प्रलंबित ...
करडी (पालोरा):- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भंडाराचे प्रकल्प संचालकांच्या दुर्लक्षाकडे दोन वर्षांपूर्वी बांधकामे पूर्ण झालेल्या २९ घरकुलांची देयके प्रलंबित आहेत. मोहाडी तालुक्यातील रमाई, शबरी व इंदिरा आवास योजनांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी अनेकदा करण्यात आली; परंतु खंड विकास अधिकारी व लोकप्रतिनिधीच्या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याने लाभार्थ्यांच्या संतापात भर पडली आहे. मोहाडी तालुक्यात सन २०१४-१५ पर्यंत रमाई, शबरी, इंदिरा आवास योजना अंतर्गत २९ धस्कुले मंजिरी करण्यात आली. सन २०१८ पर्यंत यातील लाभार्थ्यांना पहिला व दुसऱ्या टप्प्याचा निधीही देण्यात आला. बांधकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी तालुका प्रशासनाकडून वारंवार तगदा लावण्यात आला. लाभार्थ्यांनी उसने-उधार व मिळेल त्या मार्गाने पैसा गोळा केला. काहींनी घर गहाण ठेवून पतसंस्था व बँकांकडून कर्ज घेतले.
सन २०१८ च्या मध्यापर्यंत बांधकामे पूर्ण करण्यात आली. बांधकाम अभियंत्याने पाहणी केल्यानंतर ग्रामपंचायतीने बांधकामे पूर्ण झाल्याचा दाखला मिळाल्यानंतर निधीसाठी प्रस्ताव तालुका स्तरावर पाठविण्यात आला; परंतु या लाभार्थ्यांना दोन वर्षांपासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. लाभार्थी व लोकप्रतिनिधींकडून वारंवार विचारणा होत असल्याने खंड विकास अधिकारी मोहाडी यांनी पुन्हा २५ जानेवारी रोजी पत्राद्वारे निधी उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कळविले; परंतु अजूनही यासंबंधी निर्णय झालेला नाही.
बॉक्स
निधीअभावी प्रलंबित असलेले लाभार्थी
रमाई आवास योजनेत सेगो झोडे रा. सालई खुर्द, यशवंत मेश्राम रा. ताडगाव, रामकृष्ण मडामे, जांभोरा, संजीव मेश्राम रा. जांभोरा, दिलीपकुमार रामटेके रा. जांभोरा, छाया मेश्राम रा. केसलबाडा, किशोर शहारे रा. करडी, कांताबाई बागडे रा.खडकी, विलास चिमणे रा. पालोरा, संदीप खोब्रागडे रा. पालोरा, कचरू डोंगरे रा. खडकी, मीराबाई खोब्रागडे रा. पालोरा, इंदिरा आवास योजना- सहसराम शंेडे रा. हरदोली, सुभाष हुड. हरदोली, श्रीकांत मेश्राम रा. करडी, किसन नेवारे रा. करडी, सिद्धार्थ रोडगे रा. मोहगाव (करडी), गळबळ भुरे रा. पिंपळगाव (झझाड), प्रमिला हलमारे रा. सकरला, तुकाराम कावळे रा. पाहुणी, रामदास मिरासे रा. पाहुणी, दुलाराम मुळे रा. एकलारी, सत्यभामा बोरकर रा. सकरला, जमाना बोरकर रा. सकरला, क्षावण डोंगरे रा. मोहाडी, अंबिका रामटेके रा. खडकी, अनमोल शेंडे रा, पालोरा. राजीव गांधी व नवबौद्ध आवास योजना-अनुसया बालचंद घावळे रा. मुंढरी बुज,
चंपाबाई गोडाणे रा. मोहगाव(करडी) यांचा समावेश आहे.
कोट
‘श्रीकांत लोकचंद मेश्राम यांनी एका पतसंस्थेकडून घर गहाण ठेवून कर्ज घेतले होते; मात्र बांधकाम पूर्ण होऊनही प्रलंबित निधी मिळालेला नाही. जिल्हा सहकारी पतसंस्था संघाच्या विशेष वसुली व विक्री अधिकाऱ्यांकडून काही दिवसातच लिलावाची नोटीस दिल्याने पुन्हा बेघर होण्याची वेळ आणणाऱ्या प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन केले जाईल.' -निशिकांत इलमे, जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, भंडारा.
कोट
‘हक्काचे घर ही प्रत्येकाची अपेक्षा असून, शासन त्यासाठी अनेक योजना राबवित आहे; परंतु प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे लाभार्थ्यांवर कर्जाच्या ओझ्यामध्ये पुन्हा बेघर होण्याची वेळ येत असेल तर यापेक्षा दुर्दैव कोणते? जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांनी प्रकरणी लक्ष घालण्याची गरज आहे.’
-नीलिमा इलमे, माजी जि.प. सदस्य, करडी.