एसटीचे सीमोल्लंघन तरीही प्रवाशांचा ४० टक्के वाढला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:40+5:302021-07-10T04:24:40+5:30
बॉक्स दररोजचा १० लाखांचा तोटा तरीही प्रवाशांसाठी धावतेय लालपरी कोरोनापूर्वी एसटीचे उत्पन्न चांगले होते. संपूर्ण राज्यभरात भंडारा विभागाने उत्पन्नाच्या ...
बॉक्स
दररोजचा १० लाखांचा तोटा तरीही प्रवाशांसाठी धावतेय लालपरी
कोरोनापूर्वी एसटीचे उत्पन्न चांगले होते. संपूर्ण राज्यभरात भंडारा विभागाने उत्पन्नाच्या बाबतीत नावलौकिक मिळवला होता. मात्र, कोरोनानंतर ही परिस्थिती बदलली असून आता दिवसाकाठी एसटी महामंडळाला लाखोंचे उत्पन्न मिळत असले तरीही सरासरी मात्र १० लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे.
बॉक्स
भंडारा-नागपूर मार्गावर गर्दी...
सध्या रेल्वे, खासगी बसेस सुरू असल्या तरीही आजही भंडारा ते नागपूर मार्गावर एसटी बसेस, शिवशाहीलाच प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सर्वाधिक गर्दी भंडारा-नागपूर, भंडारा- गोंदिया, भंडारा-तुमसर मार्गावर असलेली दिसून येत आहे. यासोबतच अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ या लांब पल्ल्याच्या बसेससाठीही प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे.
बॉक्स
मानव विकासच्या बसफेऱ्या बंद
माध्यमिक शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी पासेस असणाऱ्या मानव बसेस फेऱ्या सध्या बंद आहेत. उर्वरित ग्रामीण भागातील ८० टक्के बसेस सुरू झाल्या आहेत. मात्र, सर्वच मार्गावरून प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. कोरोनापूर्वीच्या तुलनेत हा प्रतिसाद कमी दिसत असला तरी एसटीकडे प्रवाशांचा आजही चांगला प्रतिसाद असल्याचे विभागीय नियंत्रक विनय गव्हाणे, विभागीय वाहतूक अधिकारी डॉ. चंद्रकांत वडस्कर यांनी सांगितले.
सायंकाळी ४ नंतर प्रवासी वाहतुकीत घट...
राज्यात निर्बंध लावल्याने सायंकाळी ४ नंतर प्रवासी कमी फिरतात. अनेक मार्गांवरील फेऱ्या सुरू राहत असल्या तरी जिल्ह्यातील पवनी, तुमसर, साकोली, लाखांदूर मार्गावर सायंकाळी प्रवासी कमी राहतात. त्यामुळेच बस फेऱ्या वाढवल्यास तोटा वाढतो. यामुळेच प्रवासी आणि एसटीचे उत्पन्न याची सांगड घालूनच बस सोडण्यात येतात. ग्रामीण भागातील काही मार्गावरील प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नसल्याने या बसेस सुरू करण्यात आलेल्या नाहीत. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद पाहून या बसेस सुरू करण्यात येणार आहेत. प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करून एसटी महामंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.