रिक्त पदे असतानाही प्रत्येक कृषी कर्मचाऱ्याचे कार्य कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:37 AM2021-08-22T04:37:47+5:302021-08-22T04:37:47+5:30

कार्यरत कर्मचारी आपले कर्तव्य चांगल्या पद्धतीने निभावत आहेत. साहजिकच यामुळे शेतकऱ्यांना अनेक योजनांचा थेट लाभ मिळण्यात वाढ झाली असल्याचे ...

Despite the vacancies, the work of every agricultural worker is commendable | रिक्त पदे असतानाही प्रत्येक कृषी कर्मचाऱ्याचे कार्य कौतुकास्पद

रिक्त पदे असतानाही प्रत्येक कृषी कर्मचाऱ्याचे कार्य कौतुकास्पद

Next

कार्यरत कर्मचारी आपले कर्तव्य चांगल्या पद्धतीने निभावत आहेत. साहजिकच यामुळे शेतकऱ्यांना अनेक योजनांचा थेट लाभ मिळण्यात वाढ झाली असल्याचे प्रतिपादन भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले.

भंडारा तालुका कृषी विभागातर्फे आयोजित तालुक्यातील कृषी कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, कार्यालयीन लिपिक कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. भंडारा तालुका हा जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असल्याने इतर तालुक्यांपेक्षा भंडारात नेहमीच कामाचा ताण जास्त असतो. तालुक्यातील कृषी सहायक, कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, लिपिक, परिचर यांची अनेक पदे आजही रिक्त आहेत. असे असल्याने एका कर्मचाऱ्याकडे किमान दोन ते तीन पदभार आहेत. मात्र तरीही कर्मचाऱ्यांचे काम उत्कृष्ट असल्याचे अविनाश कोटांगले यांनी सांगितले. यावेळी कृषी सहायक गिरिधारी मालेवार, आनंद मोहतुरे, करुणा उराडे, डी. वाय. हातेल, आर. डी. भोयर, रोशन जवंजार, आश्विनी उईके, विकास मुळे, केदार, बी. एच. पडोळे, पी. पी. गोस्वामी, पर्यवेक्षक माया कांबळे, कलाम, वासनिक यांचा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी कृषी सहायक आनंद मोहतुरे यांनी आपले गत तीन वर्षातील विविध कामांचे अनुभव कथन केले. यामध्ये जलयुक्त शिवार, राष्ट्रीय अन्नसुरक्षा, सूक्ष्म सिंचन योजना, यांत्रिकीकरणाच्या योजनांतून अनेक शेतकऱ्यांना लाभ देता आल्याने समाधान मिळाल्याचे सांगितले. कृषी सहायक गिरिधारी मालेवार यांनी महापूर, तुडतुडा पंचनामे व विविध योजनाची अंमलबजावणी करताना अतिरिक्त पदभारामुळे कृषी सहायकांवरच नव्हे तर अधिकाऱ्यांवरही कामाचा प्रचंड ताण वाढला असल्याचे सांगितले. संचालन कृषी पर्यवेक्षक माया कांबळे यांनी केले तर आभार कृषी सहायक विकास मुळे यांनी मानले.

Web Title: Despite the vacancies, the work of every agricultural worker is commendable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.