पदवीधर शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:26 PM2019-07-22T23:26:43+5:302019-07-22T23:26:58+5:30
पदवीधर शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, यासाठी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघ जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांची भेट घेवून समस्यांवर चर्चा केली. चर्चेदरम्यान सीईओ जगताप यांनी मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पदवीधर शिक्षकांच्या प्रलंबित समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात, यासाठी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघ जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांची भेट घेवून समस्यांवर चर्चा केली. चर्चेदरम्यान सीईओ जगताप यांनी मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी पदवीधर शिक्षक न्यायालयीन अवमान याचीकेसंदर्भात शिक्षकांच्या वतीने महासंघाचे जिल्हाध्यक्ष युवराज वंजारी यांनी बाजू मांडली. २३ आॅक्टोबर २०१५ चे पदवीधर वेतनश्रेणी नाकारणारे शुद्धीपत्रक लगेच रद्द करून आदेशित पदवीधर प्राथमिक शिक्षकांना २५ टक्केची अट कायम ठेवून वेतन श्रेणी पूर्वलक्षी प्रभावाने देण्याचे मान्य केले. इयत्ता ६ ते ८ वीच्या विषय शिक्षकांना भाषा, गणित व विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयाचे आदेश शीघ्र देण्याचे आदेशित केले. इतर जिल्हा परिषदांच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधिन राहून रिक्त ३५ केंद्र प्रमुखांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. तसेच प्राथमिक विभागातील सहा ते आठवीच्या शिक्षकांना माध्यमिक विभागात रिक्त पदावर पदस्थापना देण्याचेही शिष्टमंडळाला सांगण्यात आले. नऊ उच्च श्रेणी मुख्याध्यापकांच्या जागा लवकरच भरण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
यावेळी उपशिक्षणाधिकारी राजभोज भांबोरे, पक्षाधिकारी मोहन तेलमासरे, राव यांच्यासह महासंघाचे राज्यप्रतिनिधी प्रमोद घमे, कार्याध्यक्ष विनोदकुमार बन्सोड, सरचिटणीस मुकूंद ठवकर, कोषाध्यक्ष भारत मेश्राम, उपाध्यक्ष गणेश शेंडे, अंकुश हलमारे, डेव्हिड गजभिये, लिलाधर वासनिक, श्रावण लांजेवार, बाळकृष्ण भूते, हरीनाद कावळे, निलेश शामकुंवर, सेवकराम हटवार आदी उपस्थित होते.