देव्हाडा घाटातील रेती चोरी प्रकरणी जबाबदारी निश्चित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:36 AM2021-02-24T04:36:42+5:302021-02-24T04:36:42+5:30
देव्हाडा बुज येथील वैनगंगा नदीतून डिसेंबरपासून सतत अवैध उत्खनन करून रेती उपसा केला जातो आहे. देव्हाडा बुज ...
देव्हाडा बुज येथील वैनगंगा नदीतून डिसेंबरपासून सतत अवैध उत्खनन करून रेती उपसा केला जातो आहे. देव्हाडा बुज येथील वैनगंगा नदीतील रेती घाटाचे लिलाव झालेले नाही. असे असतानाही सदर ठिकाणची रेती मोठ्या प्रमाणावर चोरी गेलेली आहे व आजही जात आहे, असे निवेदन देव्हाडा ग्रामपंचायतीचे सदस्य किशोर रामा रंगारी व माजी ग्रामपंचायत सदस्य दुर्योधन बोदरे यांनी कारेमोरे यांच्यासह महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी तुमसर, तहसीलदार मोहाडी यांना दिले होते. त्या निवेदनाची गंभीर दखल घेतली आहे.
देव्हाखा बुज. येथे महसूल विभागाचे तलाठी कार्यालय तसेच करडी पोलीसांची चौकी आहे. चौकीत नेहमी पोलीस कर्मचारी व होमगार्ड तैनात असतात. त्यांच्या वेतनासाठी हजारो रुपये खर्च केला जातो आहे. परंतु असे असूनही मोठ्या प्रमाणावर जमीन खरडून रेतीची तस्करी केली जात आहे. नदी पात्रात खोल पाट पडल्याने भूजलपातळी खालावली आहे. जर वैविध्यत संपुष्टात येण्याच्या धोका निर्माण झाला आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान होऊन शासनाचा महसूल बुडाला आहे. यास जबाबदार कोण?
प्रकरणी चोरी झालेल्या रेतीचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोजमाप करून संबंधित अधिकारी / कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राजू कारेमोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.