पर्यटनस्थळांचा विकास करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 10:19 PM2017-12-26T22:19:56+5:302017-12-26T22:20:18+5:30
भंडारा जिल्हा झाडीपट्टीचे काश्मीर म्हणून ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील, मुंबई, पुणे, महाबळेश्वर पर्यटन स्थळाप्रमाणे भंडारा जिल्ह्यातही भरपूर वनवैभव, वन्यजीव, जैवविविधता, नैसर्गीक खळखळणारे झरे इत्यादीने समृद्ध संपन्न अशी अनेक सुंदर व रमणीय पर्यटन स्थळे असून सुद्धा पाहिजे
आॅनलाईन लोकमत
भंडारा : भंडारा जिल्हा झाडीपट्टीचे काश्मीर म्हणून ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील, मुंबई, पुणे, महाबळेश्वर पर्यटन स्थळाप्रमाणे भंडारा जिल्ह्यातही भरपूर वनवैभव, वन्यजीव, जैवविविधता, नैसर्गीक खळखळणारे झरे इत्यादीने समृद्ध संपन्न अशी अनेक सुंदर व रमणीय पर्यटन स्थळे असून सुद्धा पाहिजे तसा पयृअन विकास आतापावतो झालेला नाही.
महाराष्ट्र पर्यटन विकासातर्फे येथील पर्यटन स्थळांचा इको टयुरिझम आराखड्यात समावेश करून तातडीने त्यांच्या विकास करण्यासंदर्भात ग्रीन हेरिटेज संस्थेचे संस्थापक मो. सईद शेख यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशन दरम्यान रविभवन येथे राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देवून त्याबाबत चर्चा केली.
मागील काही वर्षापासून गायमुख, आंबागड, पवनी, रावणवाडी इत्यादी ठिकाणी अधून मधून थातूर मातुरपणे कामे सुरू आहे. गायमुख येथे नैनितालची आठवण करून देणारे पर्वताच्या मधोमध रमणीय पांगडी जलाशय पर्यंत रोप वे व इतर विकास कामे, चांदपूर, कोका, पवनी येथील बौद्धकालीन स्तुप, गडकिल्ले, मंदिर घाट, गोसेखुर्द बांध, रावणवाडी जलाशय, तुमसर येथील माडगीजवळ वैनगंगेच्या मध्यभागी स्थित मिनी कन्याकुमारी अशी श्री नृसिंह टेकडी, पर्वतीय सौंदर्याने नटलेले कोरंभी, झिरी, हत्तीडोई, गडकुंभली साकोली, तसेच भंडारा येथील प्राचीन गिरी गोसावी यांची मंदिरे व समाध्या, अशी अनेक पर्यटन स्थळे व तिर्थक्षेत्रे जिल्ह्यात असून विकासाच्या प्रतिक्षेत आहेत.
रावणवाडी, पवनी गोसेखुर्द, कोका, चांदपूर येथे पर्यटकांची सतत वर्दळ असते. आंबागड किल्ला, गायमुख, चांदपूर, कोरंभी, झिरी आदी ठिकाणीही पर्यटक भेट देत असतात. भंडारा जिल्हा पर्यटनाच्या बाबतीत महाराष्ट्राचे स्पेन आहे. पण आवश्यक सोईसुविधा इत्यादींची येथे गरज आहे. गायमुख, चांदपूर, कोका आदी बाबत ईको टयुरीझमचा प्रस्ताव वनविभागाच्या वतीने पुर्व उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी शासनाला पाठविला होता. पण तो प्रस्ताव आतापर्यंत रखडलेला आहे.
ग्रीन हेरिटेज पर्यटन संस्था मागील अनेक वर्षापासून पर्यटन विकासाबाबत प्रयत्न व पाठपुरावा करीत आहेत. तसेच लोकप्रतिनिधींही यात प्रयत्नशील असतात. वर्तमानपत्रातून या संदर्भात बातम्या प्रकाशित होत असतात. पण याकडे नेहमी दुर्लक्ष होत असून निधीची कमतरता नेहमीच सांगितले जाते. याबाबतीत पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप दिले जाते. ही एक शोकांतीकाच.
भंडारा जिल्ह्याला पर्यटनाचा बाबतीत शासनाद्वारे झुकते माप देण्यात येवून, भरपूर निधी मंजूर करून उपेक्षित, प्रलंबित असलेल्या पर्यन स्थळांच्या विकास करण्यात यावे, असे पत्रात नमुद करण्यात आले होते.