ग्रीन व्हॅली चांदपूर स्थळाचा विकास महाराष्ट्र पर्यटन विभाग करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:04 PM2018-07-23T23:04:42+5:302018-07-23T23:05:12+5:30

ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळात दोन कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांना सुरूवात करण्यात आली आहे. ही विकास कामे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नियंत्रणात केली जात आहे. यामुळे पर्यटनस्थळाने कात टाकण्यास सुरूवात केली आहे. पर्यटनस्थळाचे विकासाने रोजगाराचे संधी उपलब्ध होणार आहे.

The development of Green Valley Chandrapur has been developed by Maharashtra Tourism Department | ग्रीन व्हॅली चांदपूर स्थळाचा विकास महाराष्ट्र पर्यटन विभाग करणार

ग्रीन व्हॅली चांदपूर स्थळाचा विकास महाराष्ट्र पर्यटन विभाग करणार

Next
ठळक मुद्देराज्य शासनाला पाच कोटीचा प्रस्ताव सादर : पर्यटनस्थळात दोन कोटीचे कामे सुरू

रंजित चिंचखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळात दोन कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांना सुरूवात करण्यात आली आहे. ही विकास कामे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नियंत्रणात केली जात आहे. यामुळे पर्यटनस्थळाने कात टाकण्यास सुरूवात केली आहे. पर्यटनस्थळाचे विकासाने रोजगाराचे संधी उपलब्ध होणार आहे.
भंडारा जिल्ह्यात राज्य शासनाने मंजुरी दिलेला सिहोरा परिसरातील एकमेव ग्रिनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळ आहे. या पर्यटनस्थळाला सन २००० मध्ये मंजुरी व कंत्राट पद्धतीवर विकसित करण्यात आले आहे. परंतु आॅगस्ट सन २०१२ पासून या पर्यटन स्थळाची लीज संपताच कंत्राटदाराने ताबा सोडला आहे. यानंतर पर्यटन स्थळाचा नव्याने विकास करण्यासाठी राज्य शासनाने नवीन टेंडरची प्रक्रिया राबविली नाही. सहा वर्ष पर्यटन स्थळाने कटूसत्य अनुभवले आहे. पाटबंधारे विभागाचे नियंत्रणात असणाऱ्या या पर्यटनस्थळाचे नाव राज्य आणि अन्य राज्याच्या कानाकोपºयात पोहचले आहे. यामुळे पर्यटनस्थळ बंद असताना पर्यटकांनी या पर्यटन स्थळात सातत्याने हजेरी लावली आहे. या कालावधीत इको टुरिजम अंतर्गत पर्यटनस्थळाचा विकास करण्यासाठी १२ कोटी खर्चाचा प्रस्ताव वन विभागाने सादर केला आहे. परंतु या प्रस्तावाला अद्याप पर्यंत मंजुरी मिळाली नाही. यामुळे पर्यटन स्थळात विकासाला 'ब्रेक' मिळत असल्याने नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात ग्रिनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाचा विषय चर्चेत ठेवण्यात आला होता. या पर्यटन स्थळात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे यंत्रणेने सर्वेक्षण केले. सर्वेक्षणाचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला असता निधी अभावी विकास कामांना गती देण्यात आली नाही. या पर्यटन स्थळात असणाºया ब्रिटीशकालीन विश्रामगृहाची नासधुस करण्यात आली आहे. या विश्रामगृहाचे जागेत नवीन विश्रामगृह बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. आमदार चरण वाघमारे यांनी पर्यटन स्थळात विश्रामगृहाचे बांधकाम करिता १ कोटी ८४ लाख रूपयांचा निधी खेचून आणला आहे. विश्रामगृहाचे बांधकामाला गती देण्यात आली आहे. यामुळे ग्रिनव्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाने विकासात कात टाकण्यास सुरूवात केली आहे. परंतु विश्रामगृह बांधकामशिवाय अन्य विकास कामांना सुरूवात व मंजुरी देण्यात आली नाही. चांदपूर जलाशय तथा लगतचे जागेत, पाणी टाकीत रामझुला, बोटींग, कौटेक, भुलभुलैया तथा जंगलाचे भ्रमण आदी पर्यटन स्थळाचे विकास कार्यात असणारे कार्य अद्याप सुरू करण्यात आले नाही. यामुळे फक्त विश्रामगृह बांधकामाने पर्यटन स्थळाचा विकास होणार नाही, असा परिसरात चर्चा सुरू आहे.
पर्यटनस्थळाचे विकास संदर्भात अनेक चर्चा असताना पर्यटन स्थळातील जलाशयात बोटींग व अन्य सुविधाचे विकास कामे करण्यासाठी राज्य शासनाने पाच कोटी रूपये खर्चाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ग्रिनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळात वनविभाग ऐवजी आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नियंत्रणात पर्यटन स्थळाचा विकास साधण्यात येणार आहे. पर्यटन स्थळाचा जलद गतीने विकास करण्याची मागणी आहे.
देवस्थानचा विकास उपेक्षित
चांदपूरात पर्यटन स्थळ आणि जागृत हनुमान देवस्थान आहे. याशिवाय चांद सॉ वली दरगाह, ऋषीमुनी आश्रम, किल्ल्याची भिंत आदी आहे. पर्यटनस्थळाचा विकास करताना या देवस्थानच्या विकास कार्यासाठी स्वतंत्र पॅकेज मंजुर करण्याची गरज आहे. यामुळे चांदपूर गावाला वैभव प्राप्त होणार आहे. पर्यटन आणि भाविकांची रेलचेल वाढणार असल्याने गावातच रोजगाराची संधी बेरोजगारांना उपलब्ध होईल.

चांदपूर पर्यटन स्थळात विश्रामगृहाच्या बांधकामाकरिता १ कोटी ८४ लाख रूपये मंजुर झाले आहेत. अन्य विकास कामे करण्यासाठी ५ कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला असून येत्या काही महिन्यात निधी मंजुरी नंतर विकास कामांना सुरूवात होईल. पर्यटनस्थळाच्या विकासाने रोजगाराचे संधी उपलब्ध होतील.
-चरण वाघमारे, आमदार, तुमसर व मोहाडी विधानसभा क्षेत्र
इको टुरिझम अंतर्गत पर्यटन स्थळात विकास करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. परंतु या प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही.
-अरविंद जोशी, वनपरिक्षेत्रधिकारी, तुमसर.

Web Title: The development of Green Valley Chandrapur has been developed by Maharashtra Tourism Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.