भंडारा जिल्ह्यात दवबिंदू गोठले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 11:53 AM2019-12-29T11:53:19+5:302019-12-29T11:54:58+5:30

जिल्ह्यात दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे.

dewdrop frozen in Bhandara district | भंडारा जिल्ह्यात दवबिंदू गोठले

भंडारा जिल्ह्यात दवबिंदू गोठले

Next

भंडारा : जिल्ह्यात दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. रविवारी सकाळी धानाच्या काडीवर दवबिंदू गोठल्याचे दिसून आले. भंडारा शहराजवळील पांढराबोडी येथील शेतात हा प्रकार दिसून आला. 


शेतकरी नितीन पडोले नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी आपल्या शेतात गेले असता त्यांना तणसावर बर्फची पातळ चादर आच्छादल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून ते आर्श्चयचकीत झाले. शनिवारी दिवसभर जिल्ह्यात हुडहुडी भरणारी थंडी होती. मात्र भंडारात तापमान मोजण्याची अधिकृत यंत्रणा नसल्याने नेमके तापमान किती हे कळू शकले नाही. जिल्ह्यात दवबिंदू गोठण्याचा हा पहिलाच प्रकार असावा, असे जाणकार सांगत आहेत.

Web Title: dewdrop frozen in Bhandara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.