धडक सिंचन विहीर लाभार्थी शेतकऱ्यांना निधीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:26 AM2021-05-29T04:26:48+5:302021-05-29T04:26:48+5:30
धडक सिंचन विहीर योजना शासनातर्फे राबविण्यात येत असून लहान शेतकऱ्यांनी कर्ज काढून आपल्या शेतीत विहिरींचे बांधकाम सुरू केले. परंतु ...
धडक सिंचन विहीर योजना शासनातर्फे राबविण्यात येत असून लहान शेतकऱ्यांनी कर्ज काढून आपल्या शेतीत विहिरींचे बांधकाम सुरू केले. परंतु शेतकऱ्यांना निधी प्राप्त झाला नाही. शेतकऱ्यांना विहिरीच्या बांधकामाला आलेल्या खर्चाची परतफेड कशी करावी असा प्रश्न पडला आहे. यापूर्वी या विषयावर निवेदन दिले होते. परंतु कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता तात्काळ धडक सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना निधी शासनाने द्यावा अशी मागणी भाजपातर्फे करण्यात आली या आशयाचे निवेदन भाजपने शुक्रवारी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना पुंडे, आशिष कुकडे, विनोद पटले, सहसराम मते, राजेंद्र पिकल मुंडे, सुनील दमाहे, कैलास ठवकर, वीरेंद्र मंदुरकर, सुभाष जांभुळकर, अनुप पारधी, विनोद बिसने, कैलास बनकर, राजकिरण पटले, रवींद्र शिंदे, सचिन पोटभरे राजू लाल पटले, दामू रहांगडाले, आशिष पारधी उपस्थित होते.