धडक सिंचन विहिरी, मामा तलावांची कामे प्राथमिकतेच्या आधारावर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 02:53 PM2021-02-03T14:53:09+5:302021-02-03T14:53:33+5:30
Bhandara News शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी शासन गंभीरतेने कार्य करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धडक सिंचन विहिरीचे रखडलेले अनुदान त्वरित देण्यात येईल, मामा तलावांचे खोलीकरण व दुरुस्तीच्या कार्यात निधीची कमतरता पडू देणार नाही. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी शासन गंभीरतेने कार्य करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्यासोबत झालेल्या चर्चेवेळी ते बोलत होते.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार राजू कारेमोरे, आमदार चंद्रिकापुरे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार राजेंद्र जैन, दिशा फाउंडेशनच्या अध्यक्ष सरीता फुंडे, मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, धनंजय दलाल, शेतकरी संघटनेचे प्रशांत पवार, जयंत वैरागडे, अंगराज समरीत, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, प्रदीप मासुरकर, शैलेश गजभिये, सुरेश बघेल, फजील खान, राशिद कुरेशी, डॉ.राजेश चंदवानी, डाॅ.अनिल शेंडे, अनिल टेंभरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
सुनील फुंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या सिंचन सोयीसंबंधीचे निवेदन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना देण्यात आले. जिल्ह्यातील धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत १३ हजार सिंचन विहिरींना मंजुरी देण्यात आली. मात्र, मागील एक वर्षापासून विहिरीचे अनुदान रखडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे, तसेच जिल्ह्यातील मामा तलावांची दुरवस्था बघता तलाव खोलीकरण व नहरांची दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात यावी, अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. याप्रसंगी सुनील फुंडे यांच्याकडून ना.पाटील व व रूपाली चाकणकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.