महासमाधी भूमी महास्तुपात उसळणार जनसागर आज धम्म महोत्सव : धम्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 10:42 PM2018-02-07T22:42:21+5:302018-02-07T22:42:55+5:30
तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या रुयाड (सिंदपुरी) येथील पञ्ञा मेत्ता संघद्वारा निर्मित भारत-जपान या मैत्रीचे प्रतीक ठरलेल्या महासमाधीभूमी महास्तुप येथे ३१ व्या धम्म महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
पवनी : तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या रुयाड (सिंदपुरी) येथील पञ्ञा मेत्ता संघद्वारा निर्मित भारत-जपान या मैत्रीचे प्रतीक ठरलेल्या महासमाधीभूमी महास्तुप येथे ३१ व्या धम्म महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोबतच महास्तुपाचा ११ वा, पञ्ञा मेत्ता बालसदनाचा दुसरा व पञ्ञा मेत्ता वाचनालयाच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त दि. ८ फेब्रुवारीला धम्म महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्ममहोत्सवात जपान, म्यानमार, तिबेट, भारत आदी देश-विदेशातील बौद्ध भिक्कुंची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार असल्याची माहिती महासमाधीभूमी महास्तुप रुयाळ येथे पत्रकार परिषदेत माजी न्यायाधीश अॅड. महेंद्र गोस्वामी यांनी दिली.
यावेळी महेंद्र गोस्वामी यांनी सांगितले की, मानवतावादी दृष्टीकोणातून १९८२ पासून पञ्ञा मेत्ता संघ महाराष्ट्र, छत्तीसगढ, गुजरात, जम्मू काश्मिर, तामिळनाडू येथे सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्य करीत आहे. याचाच एक भाग म्हणून पवनी तालुक्यातील रुयाड (सिंदपुरी) येथील महासमाधी भूमीवर २००७ ला या महास्तुपाचे लोकार्पण करण्यात आले. या स्तुपात १५० फुट उंच भगवान बुद्धांची ध्यानस्त प्रतिमा व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बोधीसत्व देंग्यो दाईशी यांच्या ६-६ फुटाच्या प्रतिमा स्थापन करण्यात आल्या आहेत.
देश- विदेशातून येणाºया बौद्ध भिक्कूंच्या उपस्थितीत होणाºया धम्म महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी भदंत संघरत्न मानके तर, उद्घाटक पञ्ञा मेत्ता संघ कमेटी जपानचे अध्यक्ष भदंत खोशो तानी व प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय भिक्कू संघाचे संघानुशासक भदंत सदानंद महास्थवीर, तेंदाई संघ इचिगुवो तेरासू उंदो जपानचे अध्यक्ष भदंत शोताई योकोयामा, म्यानमारचे भदंत डॉ. सयाडो उत्तमा, तिबेटचे भदंत लोबझान तेंबा, पय्या मेत्ता संघ जपानचे कार्याध्यक्ष भदंत शोंझे आराही जापानचे भदंत खोदो कोंदो, योशितेरू सामेजिमा, होंजिरी विहार सारनाथच्या भिक्खूनी म्योजिच्छू नागाकुबो, पश्चिम बंगालचे भदंत शुभरत्न, बौधिचेतिय संस्थान बुद्धभूमीचे अध्यक्ष भदंत धम्मदीप, विदर्भ भिक्कू संघाचे अध्यक्ष भदंत प्रियदर्शी, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय प्रचारक भदंत नागदिपांकर, प्रज्ञागिरी डोंगरगडचे भदंत धम्मतप, भदंत धम्मशिखर, नागपूरचे भदंत महापंत, भदंत मेत्तानंद, भदंत शिलवंत, भदंत संघकिर्ती, अरूणाचल प्रदेशचे भदंत वन्नास्वामी आदी उपस्थित राहणार आहेत.
धम्म महोत्सवात यावर्षी बौद्ध प्रशिक्षण संस्था बुद्धभूमी महाविहार खैरीचे अध्यक्ष भदंत सत्यशील यांना पञ्ञा पिठक व बंजारा समाजात कार्य करणारे उमेश राठोड व उपासक बेलेकर यांना पञ्ञा पिठक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.