धानाला मिळणार २५० रुपये बोनस

By admin | Published: August 1, 2015 12:11 AM2015-08-01T00:11:27+5:302015-08-01T00:11:27+5:30

आधारभूत किंमत योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम २०१४-१५ मधील खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनाने निश्चित ...

Dhan will get Rs 250 bonus | धानाला मिळणार २५० रुपये बोनस

धानाला मिळणार २५० रुपये बोनस

Next

शेतकऱ्यांना दिलासा : राज्य शासनाचा पुढाकार
भंडारा : आधारभूत किंमत योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम २०१४-१५ मधील खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २५० रुपये प्रोत्साहनपर राशी अग्रीम म्हणून स्वयंप्रपंची लेखातून तात्काळ अदा करण्याची कार्यवाही करण्याबाबत ३१ जुलै २०१५ रोजीच्या शासनपत्राद्वारे वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मुंबई यांना शासनाकडून निर्देश दिले आहे.
या हंगामात मार्केटिंग फेडरेशनमार्फत १७ लाख ५६९.१६ क्विंटल व आदिवासी विकास महामंडळामार्फत १२ लाख ६७ हजार ७६५.७२ क्विंटल धान खरेदी झाली आहे. अशी एकूण दोन्ही अभिकर्ता संस्थामार्फत २९ लाख ६८ हजार ३३४.८८ क्विंटल धान खरेदी झाली आहे. त्यामुळे प्रती क्विंटल २५० रुपये दराने ७४ कोटी २० लाख ८३ हजार ७२० रुपये एवढी रक्कम प्रोत्साहनपर राशी अदा करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Dhan will get Rs 250 bonus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.