आरक्षणासाठी धनगर समाजाचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:13 PM2018-09-24T22:13:01+5:302018-09-24T22:13:32+5:30
महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाचे चार वर्ष लोटूनही धनगर बांधवांना अनुसूचित जमाती आरक्षणाची अद्यापही अंमलबजावणी केली नाही तर शासनाला टी.स. चा अहवाल प्राप्त झाला असताना सुद्धा तोलवरूनच केंद्र सरकारला पाठवणार असे खोटे आश्वासन दिल्याने धनगर समाज संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीने आज पासून बेमुदत आमरण उपोषणाचे आयोजन केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाचे चार वर्ष लोटूनही धनगर बांधवांना अनुसूचित जमाती आरक्षणाची अद्यापही अंमलबजावणी केली नाही तर शासनाला टी.स. चा अहवाल प्राप्त झाला असताना सुद्धा तोलवरूनच केंद्र सरकारला पाठवणार असे खोटे आश्वासन दिल्याने धनगर समाज संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीने आज पासून बेमुदत आमरण उपोषणाचे आयोजन केले आहे.
धनगर समाज संघर्ष समिती भंडारा जिल्हाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजमाता अहिल्यादेवी होळकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला माल्यार्पण करून उपोषण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आले. या उपोषणात उपोषणकर्ते जिल्हाध्यक्ष राजकुमार मरठे, उपाध्यक्ष जयशंकर घटारे, राजेश पेरे, दिनेश अहिर, सोनु हातेल, सुनिल मुकूर्णे, उमेश हातेल आदीचा समावेश आहे.
२०१४ च्या निवडणुकापूर्वी विविध सभामध्ये व विशेषत: बारामती येथील सभेमध्ये आम्ही सत्तेत येताच धनगर समाजाला तात्काळ आरक्षण लागू करा असे वचन दिले होते. इतकेच नव्हे तर धनगर समाज संघर्ष समितीला लेखी पत्रही दिले होते. मात्र आपणास सत्तेत येवून चार वर्षाचा कालखंड लोटूनही आजपावतो धरगर आरक्षणाचा विषय आपण ताटकळत ठेवला आहे. आणि टिस च्या अहवालाचा आपण जो उल्लेख केला होता तो शासनाला प्राप्त झाला असून शासन केंद्र सरकारला अहवाल पाठवण्यास वेळकाढू धोरणचा अवलंब करित आहे.
संविधानात अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक ३६ वर धनगर असा उल्लेख आहे. धनगर धनगड ही एकच जमात असून केवळ इंग्रजी लिपीतील ड व देवनागरीत र असा भाषेमुळे झालेला फरक आहे. ओरीसा, बिहार, झारखंड उत्तर प्रदेश सरकारने धनगड - धनगर हे एकच आहेत, असे मान्य करून त्या राज्यात त्यांना सवलती लागू केल्या आहेत. तर महाराष्ट्र राज्यातच का नाही. तसेच मेंढपाळांना चराई क्षेत्र खुले करण्यात यावे, मेंढपाळ वस्ती गावातील माळरान खुले करण्यात यावे आदी मागण्यांचे महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाचे चार वर्षे लोटूनही धनगर बांधवांना अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर शासनाला टी.स. चा अहवाल प्राप्त झाला असतानाही तो पाठविण्यात आला नाही. त्या अनुषंगाने धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा भंडारा वतीने आमरण उपोषण सुरू केले आहे. सदर आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास संघटनेच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे. यावेळी उपोषण मंडपात धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश हातेल, राजन पडारे, चंद्रशेखर अहिर, रवि घटारे, भगवान पडोळे, मोरेश्वर पडारे, मंगलदास खऊळ पंडितराव पांडे, सुरेश कवाने आदी उपस्थित होते.