धनगर समाजासाठी राज्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:26 AM2021-06-01T04:26:30+5:302021-06-01T04:26:30+5:30
धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेनेमार्फत ...
धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेनेमार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीपासून ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीपर्यंत एक पत्र समाजासाठी एक लक्ष पत्र मुख्यमंत्री या अभियानाला सुरुवात करण्यात येत आहे.
मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजातील सर्व घटक राजकारणी, समाजकारणी, कर्मचारी, विद्यार्थी सामान्य नागरिक एकजूट होऊन आरक्षण मागणी रेटत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतरही शासन, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष असे सर्वजण मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक पाठपुरावा करत आहेत. धनगर जमातीचा एसटी यादीत समावेश न झाल्याने राज्यातील धनगर समाज मागील ६० वर्षांपासून एसटीच्या लाभापासून व संविधानिक आरक्षणापासून वंचित आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न सुप्त अवस्थेत गेला आहे. सत्ताधारी व विरोधी या दोन्ही पातळीवर त्यांची चर्चा करत नाहीत. अशा अवस्थेत धनगर समाज संकटात सापडला आहे. धनगर समाजात जागृती निर्माण करून सत्ताधाऱ्यांचे धनगर एसटी आरक्षणावर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेनेमार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीपासून अभियान राबविण्यात येत आहे.
या लढ्यामध्ये सहभागी होण्याकरीता धनगर समाजातील सर्व सामाजिक संस्था, संघटनांचा, समाजकारणी, राजकारणी यांनी सामील होऊन समाजाची जनचळवळ उभी करावी आणि शासनावर ‘धनगड’ ऐवजी ‘धनगर’ अशी दुरूस्ती करून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीचा लाभ देण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्र सरकारकडे करावी याकरिता दबाव निर्माण करण्याचे आवाहन धनगर समाजाच्या पदाधिकारी यांनी केले. या अभियानाची सुरुवात समाजाला चालना देण्याच्या हेतूने अधिकारी कर्मचारी संघटनेनेमार्फत करण्यात येत असल्याची माहिती राज्याध्यक्ष अनिल ढोले, कार्याध्यक्ष विनोद ढोरे, उपाध्यक्ष हरीश खुजे, विलास डाखोडे, महासचिव शरद मुरकुडे, कोषाध्यक्ष उज्ज्वल रोकडे, सहसचिव चुकांबे, धनविजय साटकर, रामराव लोहारे, प्रमोद फोपसे व सर्व पदाधिकारी यांनी केली आहे.