धो- धो बरसला... माहाडीत आठ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:39 AM2021-09-23T04:39:52+5:302021-09-23T04:39:52+5:30
मोहाडीच्या पश्चिमेकडील गावात मंगळवारी पाऊस धो-धो बरसला. त्यामुळे सीतेपार येथील तलावाचा पाणी भात शेतीमध्ये व गावात शिरले. हरदोली ...
मोहाडीच्या पश्चिमेकडील गावात मंगळवारी पाऊस धो-धो बरसला. त्यामुळे सीतेपार येथील तलावाचा पाणी भात शेतीमध्ये व गावात शिरले. हरदोली येथील तलावाची पार फुटली. त्यामुळे तलावाचे पाणी शेतीत गेले. मोहाडी व अन्य गावांत नाल्याचे पाणी ओव्हरफ्लो झाले. रस्त्यावर पाणी आले होते. तेच पाणी अनेकांच्या घरात घुसले. त्यामुळे ४३ घरांना याचा फटका बसला. यात एक घर पूर्णतः पडले तर ४२ घरांची अंशतः नुकसान झाले. नुकसानीचा आकडा सात लाख ९७ हजारएवढा आहे. ही सर्व नुकसानीची माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. किती घरे पडली याची माहिती घेणे सुरू आहे. तलाठ्यांनी पंचनामे करणे सुरू केले आहे. दोन दिवसांत नुकसानीची अंतिम माहिती मिळणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.
यापूर्वी ऑगस्ट महिन्यात ९ जुलै, १८ व १९ ऑगस्ट तसेच १० सप्टेंबर रोजी मोहाडी तालुक्यात अतिवृष्टीमुळे ५ घरे पूर्णतः व अंशतः ५४ घरांचे नुकसान झाले आहे. यात एकूण १५२ कुटुंबे आहेत. नुकसानीची रक्कम ४२ लाख ५५ हजार २५० रुपये आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या अनुदानाची मागणी करण्यात आली आहे.
बॉक्स
म्हणे धानाचे नुकसान झालेच नाही..!
सीतेपार येथील तलावाचे पाणी शेतात गेले. त्यानंतर तलाठी व अन्य अधिकाऱ्यांनी सीतेपारला भेट दिली. अन्य ठिकाणी धान जमिनीवर पडले. पण, धान पिकांचे नुकसान झालेच नाही, असे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. मोहाडी येथील बांधकाम उपविभाग कार्यालयाला मूल्यमापनासाठी जुलै, ऑगस्ट महिन्यातील नुकसानीचे पंचनामे सादर करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून मूल्यमापन झाल्यानंतर अनुदान वितरित करण्यात येणार आहे.