माडगी रेती घाटावर धुमाकुळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 05:00 AM2020-12-10T05:00:00+5:302020-12-10T05:00:34+5:30
माडगी गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. नदी काठावरच गाव आहे. या येथील घटातून गत काही महिन्यापासून रेतीचे उत्खनन सुरु आहे. रात्रीला ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत उपसा केला जातो. ती रेती गावाजवळच डम्पिंग करून ठेवली जाते. त्यानंतर त्या रेतीची उचल केली जाते. या उपशामुळे नदीकाठावरील घरांना धोका निर्माण झाला आहे. रात्रभर येथे ट्रॅक्टरची वाहतूक सुरू राहते. त्यामुळे गावकऱ्यांचे झोपमोड होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या माडगी येथील वैनगंगा नदीपात्रातून रात्रभर रेतीचा उपसा सुरू असतो. त्यामुळे माडगी गावाला धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून यात अर्थकारण दडल्याची माहिती आहे. याप्रकरणी स्थानिककार्यकर्त्यांनी महसूल प्रशासनाला तक्रार केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
माडगी गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. नदी काठावरच गाव आहे. या येथील घटातून गत काही महिन्यापासून रेतीचे उत्खनन सुरु आहे. रात्रीला ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत उपसा केला जातो. ती रेती गावाजवळच डम्पिंग करून ठेवली जाते. त्यानंतर त्या रेतीची उचल केली जाते. या उपशामुळे नदीकाठावरील घरांना धोका निर्माण झाला आहे. रात्रभर येथे ट्रॅक्टरची वाहतूक सुरू राहते. त्यामुळे गावकऱ्यांचे झोपमोड होते.
या रेती घाटाचा लिलाव झाला नाही. तरीही राजरोसपणे रेतीच्या उपसा सुरू आहे. महसूल प्रशासनाचे तलाठी कार्यालय आहे. परंतु त्यांनाही हा प्रकार दिसत नाही का हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. रेती तस्करीत स्थानिकांचा समावेश असल्याची माहिती आहे. माडगी येथील रेती घाटावर रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ माजवला आहे. यातील काही असामाजिक तत्त्वाचे आहेत. त्यामुळे स्थानिक त्यांचा विरोध करत नाही.
रेती तस्करांविरूद्ध महिलांचा एल्गार
माडगी येथील नदी घाटातून अवैध रेती उपसा प्रकरणात स्थानिक दारूबंदी कार्यकर्त्या महिलांनी एल्गार पुकारला आहे. त्यांनी येथील रेती चोरीच्या संदर्भात महसूल प्रशासनाकडे व पोलिस प्रशासनाकडे तक्रार केली. परंतु अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. जिल्हाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी, आमदार, पालकमंत्र्यांकडे तक्रार केली. तक्रार केल्यानंतर काही दिवस रेती चोरी बंद होते. त्यानंतर राजरोसपणे पुन्हा रेतीची चोरी सुरू होते त्यामुळे रेती तस्कर यांचे मनोबल येथे वाढले आहे.
उपोषणाचा इशारा
माडगी गाव नदी तीरावर असून तेथेच घरे आहेत. पुराचे पाणी गावात शिरते. रेतीच्या प्रचंड उपशामुळे थेट पाणी गावात येण्याची शक्यता आहे. गावाजवळच नदीत रेती उपशामुळे खूप मोठा खड्डा पडला आहे. वैज्ञानिक दृष्ट्या हे धोकादायक आहे. नदी घाट लिलाव नसताना रेतीच्या उपशामुळे घाट विद्रुप बनला आहे. रेती तस्कर यांचा कायमस्वरूपी बंदोबस्थ करावा अन्यथा उपोषणाचा इशारा कौतुका मेश्राम, जीवंनकला नागदेवे, ललिता चौरे, करुणा गजभिये, कुसुम वानखेडे, शोभा कांबळे, ममता वानखेडे, कांता बुधे, सविता पंचबुद्धे यांनी इशारा दिला आहे.