रेती तस्करांचा लिलावात रेतीघाट परिसरात धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:41 AM2021-08-20T04:41:11+5:302021-08-20T04:41:11+5:30
राजीव लिल्हारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०२०-२१ मध्ये शासनाने तालुक्यातील नांदेड येथील वैनगंगा नदीवरील रेतीघाटाचा लिलाव केला आहे. या रेतीघाटमधून ...
राजीव लिल्हारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०२०-२१ मध्ये शासनाने तालुक्यातील नांदेड येथील वैनगंगा नदीवरील रेतीघाटाचा लिलाव केला आहे. या रेतीघाटमधून शासन नियमानुसार गत १० जून रोजी रेतीचा उपसा बंद करण्यात आला आहे. दरम्यान, कोरोनाने शासन निर्देशाचे पालनात शासकीय मापदंडानुसार रेतीचा उपसा करता आला नाही. तथापि, उपसा करण्यात आलेल्या रेती साठ्याची पुरेशा प्रमाणात विक्रीदेखील झाली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, शासनाने नांदेड येथील रेतीघाट लिलाव केल्याने गावातील काही गावगुंडांचे अवैध रेती तस्करीचे व्यवसाय बंद पडल्याने गावातील सर्वसामान्य नागरिकांना भडकवून बेकायदेशीररित्या रेतीघाट चालकांचे टिप्पर अडवून मानसिक छळ करीत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी शासन प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन शासनाने लिलाव केलेल्या रेतीघाट परिसरात बेकायदेशीरपणे धुमाकूळ घालून रेती वाहतुकीस अडथळा करणाऱ्या तस्करांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे.