डिझेलची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 10:31 PM2018-05-12T22:31:50+5:302018-05-12T22:31:50+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी कोबिंग आॅपरेशन राबविण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहे. त्यावरून शुक्रवाला रात्रीपासून सर्व गस्त वाढविण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी कोबिंग आॅपरेशन राबविण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहे. त्यावरून शुक्रवाला रात्रीपासून सर्व गस्त वाढविण्यात आली. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर हे पथकासह भंडारा शहरातून पेट्रोलिंग करीत असताना मोहाडी येथील नर्मदा कॉन्व्हेंटजवळ त्यांनी एका वाहनाला पकडून अवैधरित्या वाहतूक करणाºया वाहनातून ७० लिटर डिझेल पकडले.
मोहाडीचे उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम हे ताफ्यासह पोहोल्यानंतर नाकाबंदी करण्यात आली. येणाºया जाणाºया वाहनांची तपासणी करताना रात्री १.२० वाजताच्या सुमारास तुमसरकडून लाल रंगाची डस्टर चारचाकी गाडी क्र. एम.एच. ४० के आर ८५८८ ही भरधाव वेगाने भंडाराकडे जात होती. त्यानंतर वाहन चालकाला वाहन थांबवून वाहनाची तपासणी केली असता वाहनाचे डिक्कीमध्ये दोन प्लास्टीकचे निळे कॅनमध्ये अंदाजे ३५ लिटर असा ७० लिटर डिझेल आढळून आला. वाहनातील चार लोकांना याबाबत विचारले असता त्यांची वागणूक संशयास्पद आढळून आली. या डिझेलचा काळाबाजार करण्याचे उद्देशाने वाहतूक करीत असल्याचे खात्री पटल्यामुळे वाहनात बसून असलेले संजय दुधबुरे रा.लोधीटोला ता.तिरोडा, कैलाश चौधरी रा.तिरोडा असलमखान पठाण रा.तिरोडा, राजू जांगळे रा.तिरोडा आणि डस्टर चारचाकी वाहन किंमत ५,००,००० रु., ७० लिटर डिझेल किंमत ५ हजार ताब्यात घेऊन आरोपींविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलीस निरीक्षक शिवाजी कदम हे करीत आहेत.