तुमसरात कोविड चाचण्यांच्या दरात तफावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:33 AM2021-04-12T04:33:35+5:302021-04-12T04:33:35+5:30
त्या खाजगी प्रयोगशाळेत तपासणी करताना जास्त दर देण्यात येत आहे. येथे अँटीजनचे दर ३०० रुपये व आरटीपीसीआरचे दर १६०० ...
त्या खाजगी प्रयोगशाळेत तपासणी करताना जास्त दर देण्यात येत आहे. येथे अँटीजनचे दर ३०० रुपये व आरटीपीसीआरचे दर १६०० रुपये इतके आहे. राज्य शासनाने अँटीजन व आरटीपीसीआरचे दर निश्चित केले आहेत. त्या नियमांना येथे डावलण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाने येथे सदर प्रकरणी दखल घेणे गरजेचे आहे.
तुमसर शहरात शासकीय उपजिल्हा रुग्णालयात व खाजगी प्रयोगशाळेत कोरोनाच्या अँटीजन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या जातात. उपजिल्हा रुग्णालयात ही सोय विनामूल्य करण्यात आली आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तपासण्या करण्याकरिता नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे अनेक नागरिक खाजगी प्रयोगशाळेमध्ये जात आहेत. शहरातील एका खासगी प्रयोगशाळेत अँटीजेनचे ३०० रुपये तर आरटीपीसीआरचे १६०० रुपये घेतले जात आहेत. भंडारा शहरात व इतर प्रयोगशाळेत हे दर कमी असल्याची माहिती आहे. तुमसर येथील एका खाजगी प्रयोग शाळेच्या दर्शनी भागावर अँटीजन व आरटीपीसीआरचे दर लिहिलेले आहेत. वेळ व गर्दी असल्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक खाजगी प्रयोगशाळेत चाचण्याकरिता जात आहेत. अधिक दरामुळे नागरिकात येथे असंतोष दिसत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने खाजगी प्रयोगशाळा धारकाकरिता नियमावली तयार केली आहे. स्थानिक प्रशासनाने याची दखल घेऊन दर कमी करण्याची गरज आहे.