तलाव काठावरून मुरूम उत्खननाने वृक्षांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:49 PM2017-12-02T23:49:45+5:302017-12-02T23:50:46+5:30

वृक्ष तथा पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे शासकीय आदेश असले तरी संबंधित विभागाचे दुर्लक्षामुळे कसे नुकसान होऊन नैसर्गिक तलाव धोकादायक ठरू शकतो, याचे उत्तम उदाहरण चिचोली जवळील टाकी तलावाचे देता येईल.

Digging the moor from the pond can cause trees to be destroyed | तलाव काठावरून मुरूम उत्खननाने वृक्षांना धोका

तलाव काठावरून मुरूम उत्खननाने वृक्षांना धोका

Next
ठळक मुद्देघाटी तलावातील प्रकार : वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात, तलाव खोलीकरणाच्या नावाखाली मुरूम उत्खननाची परवानगी

मोहन भोयर।
आॅनलाईन लोकमत
तुमसर : वृक्ष तथा पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे शासकीय आदेश असले तरी संबंधित विभागाचे दुर्लक्षामुळे कसे नुकसान होऊन नैसर्गिक तलाव धोकादायक ठरू शकतो, याचे उत्तम उदाहरण चिचोली जवळील टाकी तलावाचे देता येईल. जिल्हा परिषदेचा हा तलाव असून मुरूम उत्खनन करतानी काठावरील मोठ्या वृक्षांना धोका पोहोचवला गेला असून तलाव वन्यप्राणी व मनुष्याकरिता धोकादायक ठरला आहे. वन, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे.
चिचोली-सौदेपूर रस्त्यावर टाकी तलाव आहे. हा परिसराला लागून घनदाट जंगल आहे. रस्ता बांकामाकरिता तलावातून मुरूम उत्खनन करण्याची परवानगी येथे देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मालकीचा हा तलाव आहे. मुरूम उत्खननाची परवानगी महसूल प्रशासनाने दिली. ५०० ब्रास मुरूम उत्खननाची परवानगी येथे देण्यात आली आहे. त्याकरिता सुमारे दोन लक्ष ८५ हजार रूपये भरणा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्त्याकरिता मुरूमाकरिता ही मुरूम उत्खनन करण्याची परवानगी दिली, अशी माहिती आहे. सौदेपूर-खैरटोला दरम्यान सुमारे सहा कि़मी. चा रस्ता बांकाम सध्या सुरू आहे.
टाकी तलाव जूने आहे. तलावाच्या मध्यभागी सध्या येथे पाणी साठा आहे. मुरूम उत्खनन सरळ काठापासून सुरू केले आहे. तलाव काठावर लहान मोठी वृक्ष उभी आहेत. मुरूम उत्खनन करतानी वृक्षांचीमुळे उघडी पडली असून ते नियमाच्या अगदी विरोधात आहे. तलावातून मुरूम उत्खनन करतानी समतल जागा होईल याची दक्षता घेतली जाते तसा नियम आहे. एकाच ठिकाणी खड्डा तयार होईल, असे उत्खनन करता येत नाही, अगदी काठापासून मुरूम उत्खनन येथे करण्यात आले आहे. पावसाळ्यात काठापर्यंत येथे पाणी राहत नाही. पाणीसाठा राहावा याकरिता तलावांचे खोलीकरण करण्यात येत आहे. येथै वनविभाग, महसूल विभाग मूग गिळून गप्प आहे. घनदाट जंगलातील वन्यप्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. मुरूम उत्खननापूर्वी संबंधित विभागाने निर्देश व सीमांकन करून दिले काय हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होत आहे. येथे घाटी तलावाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. तलावातून माती तथा मुरूम उत्खननाचे नियम आहेत. त्या नियमांना येथे प्रथमदर्शनी डावलण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. तलावातून मुरूम उत्खननाची परवानगी रस्ता बांधकामाबाबत दिली जात आहे. परंतु नियमांना बाधा येत असेल तर त्यास संबंधित विभाग जबाबदार आहे.

Web Title: Digging the moor from the pond can cause trees to be destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.