दिघोरी येथे १११ वर्षांपासून मारबतची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 10:25 PM2018-09-10T22:25:31+5:302018-09-10T22:26:12+5:30

भंडारा जिल्ह्यात प्रसिध्द असलेल्या दिघोरी (मोठी) येथील १११ वर्षांची परंपरा असलेला मार्बत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘ईडा-पिडा टळो व बळीचे राज्य येवो’ च्या गजरात मार्बत काढण्यात आली. या उत्सवातून गावकऱ्यांनी सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले. तर महिलांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

Dighori has been in the tradition of Marbati for over 111 years | दिघोरी येथे १११ वर्षांपासून मारबतची परंपरा कायम

दिघोरी येथे १११ वर्षांपासून मारबतची परंपरा कायम

Next
ठळक मुद्देसामाजिक एकोप्याचे दर्शन : ‘ईडा-पिडा टळो व बळीचे राज्य येवो’ च्या गजरात मार्बत उत्सव

मुकेश देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघोरी (मोठी) : भंडारा जिल्ह्यात प्रसिध्द असलेल्या दिघोरी (मोठी) येथील १११ वर्षांची परंपरा असलेला मार्बत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘ईडा-पिडा टळो व बळीचे राज्य येवो’ च्या गजरात मार्बत काढण्यात आली. या उत्सवातून गावकऱ्यांनी सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले. तर महिलांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
दिघोरी येथे १९०७ साली मार्बत परंपरेला प्रारंभ झाला. तेव्हापासून अखंड ही परंपरा सुरु आहे. यावर्षी सोमवारी पाळव्यादिवशी सकाळी ८.३० वाजता शिव मंदिरात वॉर्डावॉर्डातून तयार झालेल्या मार्बत एकत्र आल्या. २१ मारबती गोळ्या झाल्यानंतर तंट्याभिल्ल व दांडपट्टा यांचे पुजन करण्यात आले. सरपंच अरुण गभणे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुभाष हटवार यांच्या नेतृत्वात शिवमंदिरातून गावकऱ्यांच्या सहकार्याने मारबतची मिरवणूक काढण्यात आली. या उत्सवात पुरुषांसोबत महिलांही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मार्बत उत्सव हा केवळ पुरुषांनी साजरा करावा असा समज दिघोरीच्या महिलांनी गेल्या अनेक वर्षांपासून खोडा ठरविला आहे. गतवर्षी तर चक्क एका महिलेने चक्क मारबत हातात पकडून आम्हीही मागे नाही हे दाखवून दिले होते. यावर्षीही काही पुरुषांनी महिलांचे कपडे तर महिलांनी पुरुषांचे कपडे परिधान करुन नवीन प्रयोग अमलांत आणला. दिघोरीचा हा उत्सव बघण्यासाठी आसपासच्या गावातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरुणाईच्या थिरकण्याने या उत्सवात भर टाकली.
यावर्षीच्या मारबतमध्ये गावातील भ्रष्टाचार, भ्रष्टाचारी नेते यासोबत निसर्गाचे रक्षण इत्यादी मुद्यांवर मारबत गाजली. नवनविन टायटलद्वारे गावकऱ्यांचे मनोरंजन झाले. शेवटी टी-पॉर्इंटवर नेवून मारबतीचे दहन करण्यात आले. ठाणेदार गावंडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कोणतीही अनुचित घटना न घडता मारबत उत्साहात काढण्यात आली. गावकºयांनी परंपरेची जोपासणा करीत मारबत काढली.

Web Title: Dighori has been in the tradition of Marbati for over 111 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.