डिजिटल शिक्षण प्रणाली सर्वोत्कृष्ट माध्यम-नागफासे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2017 01:33 AM2017-02-08T01:33:28+5:302017-02-08T01:33:28+5:30

शिक्षण पध्दतीत मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यात सर्वगुण संपन्नता निर्माण होण्यासाठी डिजिटल शिक्षण प्रणाली सुरु झाली आहे.

Digital Education System Best Media - NAGPSAS | डिजिटल शिक्षण प्रणाली सर्वोत्कृष्ट माध्यम-नागफासे

डिजिटल शिक्षण प्रणाली सर्वोत्कृष्ट माध्यम-नागफासे

Next

वरठी : शिक्षण पध्दतीत मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यात सर्वगुण संपन्नता निर्माण होण्यासाठी डिजिटल शिक्षण प्रणाली सुरु झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यात शैक्षणिक साधनांचा वापर आणि आकलन क्षमता वाढत आहे. डिजीटल शिक्षण प्रणाली सर्वोत्तम माध्यम असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य अनिता नागफासे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्रजी स्कुल कोथुर्णाच्या वार्षिक शालेय स्नेहसंमेलन व डीजीटल क्लासच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्ष म्हणून सरपंच दिलीप गायधने व प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच शिला कठाणे, सुकराम चोपकर, गणेश निकुरे, गौतम नागदेवे, बबिता चोपकर, नरेंद्र पवनकर, सेवकराम नागफासे, ललीता खोकले, गणेश सोनटक्के, ललीता ईश्वरकर, गणेश पवनकर, शिक्षण विस्तार अधिकारी विनोद चरवे, राजेंद्र लांजेवार, रवि चोपकर, प्रमोद लिचडे, जागेश्वर चोपकर व प्रमोद चकोले उपस्थित होते.
शालेय वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त आयोजित कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य अनिता नागफासे यांच्या हस्ते डिजीटल क्लास रूमचे उद्घाटन करण्यात आले. ग्राम पंचायतमार्फत शाळेला देण्यात आलेल्या जलशुध्दीकरण यंत्राचे लाकार्पण करण्यात आले. बाल आनंद मेळावा, पालक मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आले.
दोन दिवसीय कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. बक्षीस वितरण कॅनरा बँकेचे व्यवस्थापक अजित सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक सदानंद मारबते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रणवीर भवसागर, उपाध्यक्ष अनिता ईश्वरकर, राजेंद्र चोपकर, पद्माकर चोपकर, राजेंद्र लांजेवार, परमानंद भवसागर, बबिता चोपकर, श्वेता कांबळे, शालु उके, चंद्रशेखर मेश्राम, शारदा निकुरे, विकास पवनकर, मोहन चोपकर, गंगाराम खोकले, नत्थु बोंदरे, राजकुमार ईश्वरकर, शंकर चोपकर, सीमा शामकुंवर, उषा वहाने, नारायण नागपुरे, चंद्रभान मेश्राम, राजश्री चोपकर व प्रीती वहाने उपस्थित होते.
संचलन पदवीधर शिक्षक मनोहर कारेमोरे, अर्चना कुंडले, प्रास्ताविक सदानंद मारबदे व आभार वसंत काटेखाये यांनी मानले. (वार्ताहर)
 

Web Title: Digital Education System Best Media - NAGPSAS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.