लोकसहभागातून शाळा बनली डिजिटल
By admin | Published: April 1, 2017 12:43 AM2017-04-01T00:43:11+5:302017-04-01T00:43:11+5:30
महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या नेहमीच चर्चेचा विषय ठरते.
प्रगती : प्रत्यक्ष चित्रीकरणाद्वारे मुलांना मिळणार शिक्षण
अड्याळ : महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आजही जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण घेवून निघालेले आज मोठ्या पदावर कार्यरत असणारे याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी होते. यात काही शंका नाही, अशा अड्याळ येथील उत्तर बुनियादी शाळेने लोक सहभागातून प्रगती साधली आहे.
इंग्रजी खाजगी शाळेपेक्षाही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे तेही मोफत यासाठीच लोकसहभागातून डिजिटल शाळा बनविण्याचा धाडस उत्तर बुनियादी शाळेतील शिक्षकांनी केला आहे. शाळेचे डिजीटलायझेशन असल्याने येथील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष चित्रीकरणाद्वारे शिक्षण मिळणार असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार यांनी व्यक्त केले.
डिजीटल वर्ग खोल्यांचे उद्घाटन जि.प. उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उद्योगपती अमित बदियानी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वर्णलता घोडेस्वार या होते.
प्रमुख पाहुणे म्हणून शिवशंकर मुंगाले, माजी उपसभापती पंचायत समिती पवनी प्रमोद आणेराव, केंद्रप्रमुख अड्याळ, शिल्पा निखाडे, सुमन मुनिश्वर, कुंडलीक कुरंजेकर, मुनिश्वर शेख, राजु मुरकुटे आदीं मंचकावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापिका एम.पी. आदे यांनी केले. प्रास्ताविक महानंदा मेश्राम यांनी केले. तर आभार लोहकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी प्रतिनिधी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)