लोक सहभागातून शाळा झाली डिजिटल
By admin | Published: March 29, 2017 12:45 AM2017-03-29T00:45:08+5:302017-03-29T00:45:08+5:30
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शाळा सक्षम व्हावी ....
माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम : प्रेरणा सभेतून मिळाली उर्जा
मानेगाव (बाजार) : विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शाळा सक्षम व्हावी या हेतूने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानेगाव बाजार या शाळेतून शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती, ग्राम वासीयांनी शाळा डिजिटल करून चांगला उपक्रम हाती घेतला आहे.
शासनाच्या डिजिटल शाळा करण्याच्या चळवळीत येथील माजी विद्यार्थ्यांच्या वनश्री परिवार यांच्या वतीने एक एलसीडी प्रोजेक्टर व ध्वनी संच भेट देवून डिजीटल क्लॉस रूमची निर्मिती करण्यात आलेली आहे. शाळेला भौतिक सुविधा रंगरंगोटी करून भिंती बोलक्या व विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने शैक्षणिक वातावरण कसे निर्माण करता येईल यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीने पालक व ग्रामवासी यांची प्रेरणा सभा घेण्यात आली.
या सभेला महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक पी.पी. झोडे, सेलोटी (ता.लाखनी) यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्य पे्ररणासभेून उर्जा घेवून येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, सरपंच ग्रामपचांयत मानेगाव, ग्राम पंचायत सदस्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पोलीस पाटील, पालक, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामवासीयांनी पुढाकार घेतला.
लोकसहभागातून शाळा डिजिटल व्हावी, यासाठी गावातून निधी संकलित करण्यात आला. मिळालेल्या रक्कमेतून एक वर्ग खोली डिजिटल करण्यात आली आहे.
तसेच येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून एक वर्ग खोलीच्या शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी लागणारा खर्च उचललेला आहे. १०० टक्के शाळा डिजीटल करण्यासाठी शाळेचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी पालकांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. यातून विद्यार्थ्यांना मात्र चांगले शिक्षण मिळावे ही ग्रामवासीयांची अपेक्षा आहे. (वार्ताहर)