पटेल महाविद्यालयात दिग्विजय दिवस उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:58 AM2018-09-13T00:58:07+5:302018-09-13T00:59:38+5:30
येथील स्थानिक जे.एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवार ११ सप्टेंबर रोजी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील ऐतिहासिक भाषणाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव दीनानिमित्त दिग्विजय दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील स्थानिक जे.एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवार ११ सप्टेंबर रोजी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील ऐतिहासिक भाषणाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव दीनानिमित्त दिग्विजय दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने नुकताच एक ठराव मंजूर करून विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी ११ सप्टेंबरला दिग्विजय दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले होते.
त्या अनुषंगाने पटेल महाविद्यालयात हा कार्यक्रम राबविण्यात आला. मंचावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, इंटरनल क्वॉलिटी अश्युरंस सेलचे समन्वयक डॉ. कार्तिक पानिकर आणि विशेष अतिथी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सध्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सीनेट सदस्य प्रवीण उदापुरे हे होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून झाली.
प्रवीण उदापुरे यांनी उपस्थित युवकांना स्वामी विवेकानंदाच्या जीवन चरित्राला उद्देशून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अमेरिकेतील शिकागो या शहरी १२५ वर्षाअगोदर याच दिवशी सर्व धर्म विश्व संसदेला स्वामी विवेकानंद यांनी संबोधन करून पूर्ण जगाचे लक्ष भारताच्या संस्कृतीकडे वेधून घेतले होते.
त्यांच्या त्या ऐतिहासिक व्याख्यानाची आजच्या तरूण युवा पिढीला जाणीव व्हावी या उद्देशानेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने नुकताच एक ठराव मंजूर करून विद्यापीठ अंतर्गत येणाºया सर्व महाविद्यालयांनी ११ सप्टेंबरला दिग्विजय दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले.
अध्यक्ष प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही वेचक वृतांत कथन केले आणि त्यांच्या शिकागो येथील ऐतिहासिक भाषणाचे सर्वांनी सामूहिक वाचन केले व त्यांच्या सोबत उपस्थित युवकांनी त्यांना साथ दिली.
यानंतर सभागृहामध्ये स्क्रीन वर स्वामी विवेकानंदांच्या भाषणाची विडिओ फित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र शाह यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, क्रीडा विभाग विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होे. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.