दीक्षा अॅप निर्मितीत भूषण सपाटे यांचा वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 10:38 PM2018-07-04T22:38:59+5:302018-07-04T22:40:47+5:30
शिक्षकांना वर्गात मोबाईल वापरावर सूट दिली गेली. त्यानंतर अनेक शिक्षकांनी शिक्षणविषयक अॅप तयार केले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ‘दीक्षा’ अॅपची निर्मिती करण्यात आली. या निर्मितीत भंडारा येथील जीजामाता विद्यालयातील सहाय्यक शिक्षक भूषण फसाटे तसेच प्राथमिक शिक्षक देवानंद घरत, कैलाश चव्हाण, शिवशंकर राठोड यांनी योगदान दिले. त्यांच्या या योगदानाबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पुणे येथे सन्मानित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : शिक्षकांना वर्गात मोबाईल वापरावर सूट दिली गेली. त्यानंतर अनेक शिक्षकांनी शिक्षणविषयक अॅप तयार केले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ‘दीक्षा’ अॅपची निर्मिती करण्यात आली. या निर्मितीत भंडारा येथील जीजामाता विद्यालयातील सहाय्यक शिक्षक भूषण फसाटे तसेच प्राथमिक शिक्षक देवानंद घरत, कैलाश चव्हाण, शिवशंकर राठोड यांनी योगदान दिले. त्यांच्या या योगदानाबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पुणे येथे सन्मानित करण्यात आले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत शिक्षण विभागाकडून राष्ट्रीय शिक्षण प्रशिक्षण परिषदेच्या दीक्षा अॅपवर महाराष्ट्र इन सर्विस टिचर्स रिर्सोस अॅप मित्र २० हे मोबाईल अॅप निर्माण करण्यात आले.
यात २ जुलै रोजी दिक्षा अॅपचा शुभारंभ पुणे येथे करण्यात आला. ज्या शिक्षकांचा दिक्षा अॅपच्या निर्मितीत सहभाग होता. त्या सगळयांचा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. यात भंडारा जिल्हयातील माध्यमिक शिक्षक भूषण फसाटे, देवानंद घरत, कैलास चव्हाण, शिवशंकर राठोड यांचा समावेश होता.
राज्यातील पहली ते दहावीच्या पाठ्या पुस्तकांमध्ये प्रत्येक पाठासाठी क्यूआर कोड दिला गेला आहे. क्यूआर कोडच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले ई-साहित्य दीक्षा अॅपशी जोडले गेले आहेत. शिक्षकांना हा ई-साहित्य सहज वापरण्यासाठी दीक्षा अॅपचा फायदा होणार आहे. राज्यातील शिक्षकांनी व विषय सहायकांनी ई-साहित्य तयार करुन दीक्षा अॅपरला समृध्द बनविण्यास मदत केली. त्यात भंडारा जिल्हयातील या चार शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. जिल्हयाने दिलेल्या योगदानामुळे जिल्हयाची शिक्षण क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे. डिजीटल माध्यमे प्रभावी होत असून शिक्षणात या माध्यमाचा बराच उपयोग होत आहे. व्हिज्युअल माध्यमामध्ये मोठी शक्ती आहे. जे ऐकले जाते ते लवकर लक्षात राहते. शाळांमध्ये मोबाईलच्या माध्यमातून शिक्षणाला पुरक व्हीडीओ व अन्य शैक्षणिक बाकी दाखविणे शक्य झाले आहे. जिल्ह़ातील शिक्षकांनी राज्यस्तरावर तयार केलेल्या अॅपच्या निर्मितीत मोठा सहभाग दिल्याने त्यांचे शिक्षण क्षेत्रात कौतुक होत आहे.