करडी येथे धान खरेदीसाठी संचालकाची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:24 AM2021-06-28T04:24:17+5:302021-06-28T04:24:17+5:30

पांजरा व बोरी हे गाव अगोदर शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र पालोरा येथे जोडलेले होते. शेतकऱ्यांचे सातबारा ऑनलाइनही करण्यात ...

Director's refusal to buy paddy at Kardi | करडी येथे धान खरेदीसाठी संचालकाची टाळाटाळ

करडी येथे धान खरेदीसाठी संचालकाची टाळाटाळ

googlenewsNext

पांजरा व बोरी हे गाव अगोदर शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र पालोरा येथे जोडलेले होते. शेतकऱ्यांचे सातबारा ऑनलाइनही करण्यात आले होते. परंतु पालोरा येथील धान खरेदी केंद्रावर गोडाऊन उपलब्ध नसल्याने पांजरा व बोरी हे गाव करडी केंद्राला जोडले गेले. परंतु अजूनही करडी केंद्रावर पांजरा, बोरी येथील शेतकऱ्यांचे धानाची खरेदी करण्यात आलेले नाही.

शेतकरी धान खरेदी केंद्रावर गेले असता केंद्रप्रमुखाकडून टाळाटाळ केली जात आहे. नंतर खरेदी करू, आपणाला कळविले जाईल, असे उत्तर देऊन वेळ मारून नेली जात आहे. करडी केंद्र अंतर्गत येत असलेल्या शेतकऱ्यांनी सातबारा ऑनलाइन केलेले आहेत. परंतु, पांजरा व बोरी गाव नंतर जोडलेली असल्यामुळे तुमच्या धानाचे मोजमाप करायला वेळ लागेल, असे सांगितले जाते. पालोरा केंद्रात जोडलेली पांजरा व बोरी गाव केंद्र सुरू करण्यापूर्वी करडी केंद्रात जोडायला पाहिजेत होते. आता शेतकऱ्यांचे ऑनलाइन सातबारा पालोरा केंद्रावर आणि धानाचा काटा करडी केंद्रावर अशा परिस्थितीमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी लक्ष देऊन पांजरा व बोरी येथील शेतकऱ्यांचा धानाचा काटा करण्यासाठी आदेशित करावे, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, आमदार राजू कोरेमोरे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, तहसीलदार मोहाडी यांना निवेदनद्वारे तक्रार शेतकऱ्यांनी दिली आहे. तक्रारकर्ते शेतकऱ्यात सचिन साठवणे, लखपती साठवणे, परसराम लांडगे, मोनू साठवणे, वातू साठवणे, अण्णा साठवणे, उत्तम साठवणे, मारुती रोकडे, राजकुमार चौरागडे, सुनील राऊत, राजकुमार माटे, अजय रोकडे, श्रीराम राऊत, बाबूलाल राऊत, मनोहर राऊत, दादाराम चांदेवार, तेजराम राऊत यांचा समावेश आहे.

Web Title: Director's refusal to buy paddy at Kardi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.