विहीर खोदताना मातीचा ढिगारा कोसळून मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:10 PM2018-05-15T23:10:37+5:302018-05-15T23:11:26+5:30
शेतात विहीरीचे खोदकाम झाल्यानंतर बांधकाम करताना मातीचा ढिगारा मजुराच्या अंगावर कोसळल्याने एका जागीच मृत्यू झाला. यात पाचजण गंभीररित्या जखमी झाले आहे. ही घटना मंगळवारला (दि.१५) सकाळी ८ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथील जगदीश बावनकर यांच्या शेतात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : शेतात विहीरीचे खोदकाम झाल्यानंतर बांधकाम करताना मातीचा ढिगारा मजुराच्या अंगावर कोसळल्याने एका जागीच मृत्यू झाला. यात पाचजण गंभीररित्या जखमी झाले आहे. ही घटना मंगळवारला (दि.१५) सकाळी ८ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथील जगदीश बावनकर यांच्या शेतात घडली.
आनंदराव सखाराम ढोरे (५५) रा.कऱ्हांडला असे मृतकाचे नाव असून जागेश्वर खुशाल ठाकरे (३५), शंकर नानाजी शहारे (४६), सुधाकर यशवंत तोंडरे (४५), सीताराम जागो राऊत (४५), जगदीश सीताराम बवनकर (४८) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. सर्व जखमींवर लाखांदूर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार, बावनकर यांच्या शेतात विहीर बांधकामासाठी जेसीबीद्वारे खोदकाम केले होते. भूजल पातळी खालावल्याने खोदकाम सुरू होते. दरम्यान, विहीरीला पाणी लागताच शेतमालक बावनकर यांनी विहिरीचे सिमेंटने बांधकाम सुरू केले होते. या बांधकामादरम्यान जमिनीच्या समतल असलेला मातीचा मजुरांच्या अंगावर कोसळला. यात पाच मजुरांसह आनंदराव ढोरे हे दबल्या गेले. यातच ढोरे यांचा मृत्यू झाला. यात चार जण गंभीर तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मृतदेह विहीरीतून बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.