खतासाेबत लिंकिंग बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:22 AM2021-07-05T04:22:41+5:302021-07-05T04:22:41+5:30
निवेदनानुसार खत कंपन्यांनी केंद्र सरकारच्या आदेशाला झुगारून रासायनिक खताची भाववाढ केली आहे. हा प्रकार म्हणजे ऐन खरीप हंगामाच्या ताेंडावर ...
निवेदनानुसार खत कंपन्यांनी केंद्र सरकारच्या आदेशाला झुगारून रासायनिक खताची भाववाढ केली आहे. हा प्रकार म्हणजे ऐन खरीप हंगामाच्या ताेंडावर शेतकरी व डिलर यांना अडचणीत आणणारा आहे. यामुळे खताच्या विक्रीवर परिणाम करून खत विक्री करणाऱ्यांना अडचणीत आणण्याचे व शेतकऱ्यांच्या आक्राेशाला बळी पाडण्याचे कटकारस्थान कंपन्यांकडून हाेत आहे.
खत कंपन्यांवर शासनाचे निर्बंध नसल्यामुळे विद्रेय, जीवाणू खतांचे लिंकिंग सुरू आहे. याशिवाय बाेगस खते, अनावश्यक द्रव्यरूपी व इतर खते संदर्भात कंपन्यांची लिंकिंग पद्धतीबाबत प्रथम उत्पादक कंपन्यांवर कारवाई करावी, अन्यथा या कंपनींची खते विक्रीवर बहिष्कार घालण्याचा इशाराही दिला आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्र शासनाने खतावर सबसिडी जाहीर केल्यानंतरही खत कंपन्या स्वमर्जीने रासायनिक खतांची किंमत वाढवीत आहे. यासाेबतच लिंकिंग पद्धतही राबवीत आहे. त्यामुळे खतासाेबत लिंकिंग पद्धत करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, खत दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा खत कंपन्यांवर बहिष्कार घालण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा जिल्हा ॲग्राे डिलर असाेसिएशनने दिला आहे.
निवेदनानुसार खत कंपन्यांनी केंद्र सरकारच्या आदेशाला झुगारून रासायनिक खताची भाववाढ केली आहे. हा प्रकार म्हणजे ऐन खरीप हंगामाच्या ताेंडावर शेतकरी व डिलर यांना अडचणीत आणणारा आहे. यामुळे खताच्या विक्रीवर परिणाम करून खत विक्री करणाऱ्यांना अडचणीत आणण्याचे व शेतकऱ्यांच्या आक्राेशाला बळी पाडण्याचे कट कारस्थान कंपन्यांकडून हाेत आहे.
खत कंपन्यांवर शासनाचे निर्बंध नसल्यामुळे विद्रेय, जीवाणू खतांचे लिंकिंग सुरू आहे. याशिवाय बाेगस खते, अनावश्यक द्रव्यरूपी व इतर खते संदर्भात कंपन्यांची लिंकिंग पद्धतबाबत प्रथम उत्पादक कंपन्यांवर कारवाई करावी, अन्यथा या कंपनींची खते विक्रीवर बहिष्कार घालण्याचा इशाराही दिला आहे.