अपंग शिक्षकाला अतिरिक्त ठरवून केले कार्यमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:32 PM2017-11-08T23:32:28+5:302017-11-08T23:33:12+5:30

सर्व शिक्षा अभियानांतर्गत विशेष शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या योगेश लालुसरे यांच्यासह सात जणांना अतिरिक्त ठरविण्यात आले.

The disabled teacher has decided to do extra work-related tasks | अपंग शिक्षकाला अतिरिक्त ठरवून केले कार्यमुक्त

अपंग शिक्षकाला अतिरिक्त ठरवून केले कार्यमुक्त

Next
ठळक मुद्देदोन महिन्यांपासून पायपीट : वरिष्ठांच्या निर्देशांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रशांत देसाई।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सर्व शिक्षा अभियानांतर्गत विशेष शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या योगेश लालुसरे यांच्यासह सात जणांना अतिरिक्त ठरविण्यात आले. दरम्यान त्यांची नागपूर येथे बदली करण्यात आली. मात्र अंध असल्याने नागपूर येथील कार्यस्थळ झेपणारे नसल्याने त्यांनी वरिष्ठांकडे केलेल्या विनंतीनुसार त्यांची भंडारा येथे परत बदली करण्यात आली. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने रूजू केल्यानंतर त्यांना तडकाफडकी कार्यमुक्त केले. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून त्यांची नोकरी मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत अंध प्रवर्गात विशेष शिक्षक म्हणून योगेश लालुसरे हे मोहाडी पंचायत समिती येथे सहा वर्षापूर्वी रूजू झाले होते. त्यांच्याकडे असलेल्या कार्याची त्यांनी सहा वर्षात इमाने इतबारे कर्तव्यापालन केले. दरम्यान जिल्ह्यातील सात विशेष शिक्षकांना अतिरिक्त ठरवून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या आदेशानी नागपूर महानगरपालिका येथे त्यांची बदली करण्यात आली. मात्र ही बदली प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासनाने राबविताना अनियमितता केल्याचा आरोप लालुसरे यांनी केला आहे. दरम्यान त्यांना नागपूर येथे कार्यस्थळ दिल्याने लालुसरे हे दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याने महानगर पालिकेतील कार्यक्षेत्र त्यांच्यासाठी अवघड ठरले. त्यामुळे लालुसरे यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईकडे विनवणी करून त्यांची बदली पूर्ववत भंडारा येथे केली. मात्र जिल्हा परिषद भंडारा यांनी लालुसरे यांना रूजू करून घेण्यात अतिरिक्त असल्याचा ठपका ठेवत सुरुवातीला आडकाठी आणली. मात्र त्यानंतर त्यांना रूजू केले. दरम्यान जुलै आणि आॅगस्ट २०१७ पर्यंत त्यांच्याकडून सर्व शिक्षा अभियानाचे काम करवून घेण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांना विश्वासात न घेता लालुसरे यांना तडकाफडकी नोकरीवरून कार्यमुक्त केले. यामुळे दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या लालुसरे यांनी मागील दोन महिन्यांपासून त्यांची नोकरी परत मिळावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे विनवणी केली आहे. मात्र त्यांच्या विनवणीकडे जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
याबाबत जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियान व शिक्षण विभागात संपर्क साधला असता अद्याप महाराष्ट्र शिक्षण परिषदेने कुठल्याही प्रकारचे दिशानिर्देश दिले नसल्याने प्रकरण खोळंबले असल्याची माहिती समन्वयक गौतम यांनी दिली.
राज्य समन्वयक म्हणतात आदेश चुकीचा
जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यपालन अधिकारी (सामान्य) मंजुषा ठवकर या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदचे राज्य समन्वयक अजय काकडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून लालुसरे यांची कैफियत मांडली. यावर काकडे यांनी लालुसरे यांची केलेली बदली व त्यांना दिलेले कार्यमुक्तीचे आदेश हे मुळात चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लालुसरे यांना नोकरीवर पुन्हा रूजू करावे असे त्यांनी एका पत्राद्वारे जिल्हा परिषद प्रशासनाला महिनाभरापूर्वी कळविल्याचे समजते.
लालुसरे यांची अपग्रेड नंतर नियुक्ती
भंडारा जिल्हा सर्व शिक्षा अभियानात विशेष तज्ज्ञ हे एक पद मंजूर आहे. यासह विशेष शिक्षकांचे ४९ पद मंजूर आहे. त्यातील विशेष शिक्षकांची पदे संपूर्ण भरलेली असून विशेष तज्ज्ञाचे एक पद रिक्त आहे. त्यामुळे राज्य समन्वयक काकडे यांनी ४९ विशेष शिक्षकांमधून विषय तज्ज्ञपदी एकाची नियुक्ती करून लालुसरे यांना रिक्त होणाºया विषय शिक्षकाच्या जागेवर रूजू करावे असे निर्देश देण्यात आले असताना या बाबीकडे जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

Web Title: The disabled teacher has decided to do extra work-related tasks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.