सोयीसुविधांअभावी भाविकांची गैरसोय
By Admin | Published: May 5, 2016 12:58 AM2016-05-05T00:58:53+5:302016-05-05T00:58:53+5:30
केंद्र व राज्य शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेल्या भंडारा जिल्ह्यातील प्राचीन पवनी नगरात, भगवाननगर येथे एक भव्य साईमंदिर जागृत देवस्थान आहे.
पवनी पर्यटनस्थळ परिसर : साईभक्तांची व्यथा
पवनी : केंद्र व राज्य शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेल्या भंडारा जिल्ह्यातील प्राचीन पवनी नगरात, भगवाननगर येथे एक भव्य साईमंदिर जागृत देवस्थान आहे. सदर साईमंदिर अनेकांच्या सहकार्यातून पवनीतील एका मोठ्या सुप्रसिद्ध कुऱ्हाडा तलावाच्या काठावर मागीलव् ार्षी निर्माण करण्यात आले होते. साईमंदिराला दर्शन घेणाऱ्या भाविक भक्तांची संख्या दर दिवशी ३०० ते ४०० तसेच दर गुरूवारला हजाराच्या वर असते. परंतु मंदिरापर्यंत जाण्याकरीता पक्का रस्ता व पथदिवे नसल्यामुळे येणाऱ्या भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
सद्यस्थितीत दर्शनाला येण्याकरिता पवनी मच्छीमार सोसायटीच्या मार्गाने कुऱ्हाडा तलावाच्या पाळीवरून एक जुना कच्चा रस्ता उपलब्ध आहे तसेच गोसे धरणाच्या उजव्या कालव्याच्या दिशेकडून मंदिराकडे येणारा अतिशय कच्चा व असुरक्षित आडमार्गाचा वापर करावा लागत आहे. पवनी परिसरातील स्थानिक नागरिकांच्या व साईभक्तांच्या सुरक्षित व सोयीच्या रहदारीकरीता निलज नागपूर मेन रोडवरील पवनी बस आगार समोरून ते शेषनगर, संताजीनगर ले-आऊट मधून पुढे भगवाननगर व बेलघाटा वॉर्ड पवनीपर्यंत एक सुरक्षित व पक्का एप्रोच रोड असावे, अशी रास्त मागणी जनतेच्या वतीने सातत्याने होत आहे. तसेच असलेल्या काही किरकोळ तांत्रिक अडचणी सोडवून स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक, ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी संयुक्तपणे प्रयत्न करून मच्छीमार सोसायटी पवनीच्या बाजूंनी कुऱ्हाडा तलावाच्या पाळीवरून एक सुरक्षित, पक्का रहदारी मार्ग व पथदिव्यांची व्यवस्था संबंधित विभागाच्या मार्फत करण्यात यावे मागणीची पूर्तता झाल्यास संपूर्ण पवनी व परिसरातील नगरवासी जनता आपले आभार मानतील, याने या दुर्लक्षित असलेल्या परिसराचा आणखी विकास होण्यास मदतच होईल. (तालुका प्रतिनिधी)