सुविधांअभावी प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 01:23 AM2018-01-06T01:23:54+5:302018-01-06T01:24:05+5:30
तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील गावात प्रवाशांच्या सोयीसाठी निवाऱ्याचे बांधकाम केले. या प्रवाशी निवाऱ्याजवळ बस फेऱ्या थांबा देत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. यामुळे अपघतााची शक्यता वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील गावात प्रवाशांच्या सोयीसाठी निवाऱ्याचे बांधकाम केले. या प्रवाशी निवाऱ्याजवळ बस फेऱ्या थांबा देत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. यामुळे अपघतााची शक्यता वाढली आहे.
तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील गावात प्रवाशाच्या सोयीसाठी प्रवाशी निवाºयाचे बांधकाम करण्यात आले. परंतु या निवाऱ्याजवळ रापम बस थांबा देत नाही. राज्य मार्गावरील अन्य चौकात गर्दीचे ठिकाणी बस थांबा देत आहे. या चौकात प्रवाशी सैरवैर उभे असतात. काही ठिकाणी अन्य रस्ते जोडण्यात आली आहे. यामुळे बसमध्ये प्रवाशी घाईगर्दीने धाव घेतात. परिणामत: घाईगडबडीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही गंभीर घटना टाळण्यासाठी प्रवाशी निवाऱ्याची स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. तुमसर-बपेरा मार्गावरील हरदोली गावात ग्रामपंचायतमार्फत स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. या गावात प्रवाशी निवारा असताना प्रवाशी अन्य धोकादायक चौकात बसची प्रतिक्षा करीत आहेत. तर पान टपरीचा आसरा घेत आहेत.
या चौकात प्रवाशाची वाढती गर्दी राहत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संभावित धोका टाळण्यासाठी प्रवाशी निवाऱ्याची रंगरंगोटी करण्यात आली आहे. याच प्रवाशी निवाऱ्याचे शेजारी कचराकुंडी तयार करण्यात आली आहे. प्रवाशी निवाºयाचे शेजारी पुरूष आणि महिला यांचेसाठी प्रसाधन गृहाचे बांधकाम होणार असून पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी हातपंप मंजुरीचा प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रवाशी निवाऱ्याची स्वच्छता व देखभालीची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. ग्रामपंचायत या बाबीकडे दुर्लक्ष करित आहेत.