जिल्ह्यात आज ६० रुग्णांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:18 AM2020-12-28T04:18:33+5:302020-12-28T04:18:33+5:30

बरे झालेले रुग्ण ११४९५ पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या १२२१० क्रियाशील रुग्ण ४२६ आज ०० मृत्यू एकूण मृत्यू २८९ रुग्ण बरे ...

Discharge of 60 patients in the district today | जिल्ह्यात आज ६० रुग्णांना डिस्चार्ज

जिल्ह्यात आज ६० रुग्णांना डिस्चार्ज

Next

बरे झालेले रुग्ण ११४९५

पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या १२२१०

क्रियाशील रुग्ण ४२६

आज ०० मृत्यू

एकूण मृत्यू २८९

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१७ टक्के

भंडारा : जिल्ह्यात आज ६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ११४९५ झाली असून आज २१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२२१० झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१७ टक्के आहे.

आज ४३६ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी २१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत १ लाख ३ हजार २०३ व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात १२२१० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील ९, मोहाडी २, तुमसर ६, पवनी २, लाखनी १, साकोली १ व लाखांदुर तालुक्यातील ० व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत ११४९५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या १२२१० झाली असून ४२६ क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या ०रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण२८९ झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१४ टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर ०२.३७ टक्के एवढा आहे.

शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

Web Title: Discharge of 60 patients in the district today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.