बावनथडी प्रकल्पातून ७० दलघमी पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 05:00 AM2020-10-04T05:00:00+5:302020-10-04T05:00:38+5:30

महाराष्ट्र-मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या आंतरराज्यीय प्रकल्प शेतकºयांसाठी वरदान ठरणारा आहे. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाला. त्यामुळे हा प्रकल्प तब्बल आठ वर्षानंतर ९५ टक्के भरला आहे. यापुर्वी या प्रकल्पातून पऱ्हे वाचविण्यासाठी २५ दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. आगामी उन्हाळी पिकांसाठीही या प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे.

Discharge of 70 gallons of water from Bawanthadi project | बावनथडी प्रकल्पातून ७० दलघमी पाण्याचा विसर्ग

बावनथडी प्रकल्पातून ७० दलघमी पाण्याचा विसर्ग

googlenewsNext
ठळक मुद्देप्रकल्पात विक्रमी ९५ टक्के जलसाठा, दोनही राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतोय लाभ

मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : यंदा झालेल्या मुबलक पावसाने आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्प तुडूंब भरले असून सद्यस्थिती या प्रकल्पात विक्रमी ९५ टक्के जलसाठा आहे. आतापर्यंत या प्रकत्पातून ७० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. याचा फायदा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशासाठी शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत आहे.
महाराष्ट्र-मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या आंतरराज्यीय प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा आहे. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाला. त्यामुळे हा प्रकल्प तब्बल आठ वर्षानंतर ९५ टक्के भरला आहे. यापुर्वी या प्रकल्पातून पऱ्हे वाचविण्यासाठी २५ दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. आगामी उन्हाळी पिकांसाठीही या प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे. आतापर्यंत या प्रकल्पातून ७० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला आहे.
प्रकल्पाचे अधिकारी पाणी विसर्गादरम्यान व मुख्य कालवा व इतर माईनरवर लक्ष ठेवून आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यातील सर्व मायनर सध्या सुरू आहे. पुढील आदेशापर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा प्रकल्प ऑगस्ट महिन्यात मात्र कर्दनकाळ ठरला होता. महापुराने नदीतीरावरील अनेक गावे आणि शेती जलमय झाली होती. शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान झाले आहे.

दोनही राज्यांसाठी पाण्याचा विसर्ग
बावनथडी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील शेतकºयांसाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हा प्रकल्प दोनही राज्यांसाठी वरदान असून तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील शेतकºयांना याचा मोठा फायदा होत आहे. आतापर्यंत या प्रकल्पातून ७० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले असून सर्व मायनरने पाणी सिंचनाकरीता देण्यात येत असल्याची माहिती बावनथडी प्रकल्पाचे अभियंता आर.आर. बडोले यांनी दिली आहे. यंदा हा प्रकल्प तुडूंब भरल्याने उन्हाळी धान पिकालाही त्याचा फायदा होणार आहे. केवळ कालव्यांची डागडुजी आणि दुरूस्ती करण्याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी पाणी सोडल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर पडणार आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Discharge of 70 gallons of water from Bawanthadi project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.