चार रुग्णांना सुटी, १७ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:23 AM2021-06-21T04:23:31+5:302021-06-21T04:23:31+5:30
भंडारा : जिल्ह्यात रविवारी चार रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १७ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. बरे झालेल्या ...
भंडारा : जिल्ह्यात रविवारी चार रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १७ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५८,१७७ झाली आहे.
जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५९,३७१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९८ टक्के आहे.
रविवारी ७०३ व्यक्तींच्या घशातील स्रावांचे नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत ४ लाख १० हजार ५७२ व्यक्तींच्या घशातील स्रावांची तपासणी करण्यात आली. त्यात ५९,३७१ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. १७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यामध्ये भंडारा तालुक्यातील ४, तुमसर १, लाखनी ३, साकोली २ व लाखांदूर तालुक्यातील ७ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १३९ क्रियाशील रुग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण १०५५ आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ०१.७८ एवढा आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयांत बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राइब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.