ठाण्यातील आठवडी बाजाराला अस्वच्छतेचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 09:56 PM2018-07-03T21:56:11+5:302018-07-03T21:56:27+5:30

भंडारा तालुक्यातील नव्या रूपात उदयास येणारी तथा खेड्यातून शहरी करणाकडे वळणारी ठाणा सिटीमध्ये ग्रामपंचायत शासन-प्रशासनाचे नियोजन शुन्य कारभत्तर कंत्राटदाराचे बाजार प्रती दुर्लक्ष यामुळे बाजारात अस्वच्छतेचा पसारा पडलेला आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Disconnection of the week's market in Thane | ठाण्यातील आठवडी बाजाराला अस्वच्छतेचा विळखा

ठाण्यातील आठवडी बाजाराला अस्वच्छतेचा विळखा

Next
ठळक मुद्देभाजी विक्रेत्यांचाही मनमानी कारभार : कंत्राटदाराचे व ग्रामपंचायतचे दुर्लक्ष, नागरिकांच्या आरोग्याला धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : भंडारा तालुक्यातील नव्या रूपात उदयास येणारी तथा खेड्यातून शहरी करणाकडे वळणारी ठाणा सिटीमध्ये ग्रामपंचायत शासन-प्रशासनाचे नियोजन शुन्य कारभत्तर कंत्राटदाराचे बाजार प्रती दुर्लक्ष यामुळे बाजारात अस्वच्छतेचा पसारा पडलेला आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भंडारा जिल्हा आठवडी बाजारांचा लिलाव हे जिल्हा परिषदतर्फे करण्यात येतो. मात्र ठाणा येथील बाजार स्वत:च्या मालकीचा असल्यामुळे येथे ग्रामपंचायत ठाणा हे दर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बाजार लिलाव करीत असतो.
भंडारा परिसरातील बाजार कंत्राटदार या बाजार लिलावात हिरीरीने सहभाग नोंदवित असतात. दरवर्षी येथील बाजार लिलाव वाढीवर असतो. त्या मानाने येथील कंत्राटदाराची रक्कमही वाढत असते. ठाणा येथे आठवड्यातून अर्थात बुधवार व रविवारला बाजार भरत असतो. बाजारात येणारे विक्रेते हे भंडारा, शहापूर, नांदोरा, निहारवानी, चिखलाबोडी, धानला, बोरगाव, महादुला, पांजरा, चिखली, खरबी, राजेदहेगाव, परसोडी, ठाणा, सावरी, कोंढा, पेवठा या ठिकाणाहून भाजी व खाद्य विक्रेते येत असतात. सकाळपासून येथे विक्रेत्यांची रेलचेल असते. ग्रामपंचायत ठाणा कार्यालयात तलावाजवळ हा बाजार भरतो. येथे येणारे भाजी विक्रेते तलावातील अस्वच्छता पाण्याद्वारे पालेभाज्या धुत असतात. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बुधवार व रविवारला साहित्याची विक्री करीत अनावश्यक भाजीपाला त्याच ठिकाणी सोडून जातात. दुसऱ्या दिवशी बाजारात सडलेले, कुजलेले भाजीपाल्यांची दुर्गंधी येत असते. बाजार व्यतिरिक्त दिवसी जेष्ठ नागरिक या मोकळ्या जागेवर फिरायला जाताना अस्वच्छताच्या त्रासाला बळी पडतात. याबाबद ग्रामपंचायत कमेटीला याबाबद विचारणा केली असता सुमारे पावणे चार लाखाच्या कंत्राटदारामध्ये अस्तित्वात असलेल्या बोरचा वापर बाजाराची स्वच्छता व पार्किंगची सोय कंत्राटदाराकडे असल्याचे सांगितले जाते. दुर्गंधी धोरणामुळे व ग्रामपंचायत शासन-प्रशासासनाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. परिणामी भविष्यात मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जेष्ठ नागरिक गंगाराम धांडे यांनी याबाबद ग्रामपंचायतला वारंवार सांगितले असता याकडे कानाडोळा करीत आहे. या ज्वलंत प्रश्नाकडे संबंधित वरिष्ठ विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

Web Title: Disconnection of the week's market in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.