बेपत्ता चांडक यांचा शोध सुरूच
By admin | Published: May 11, 2016 12:49 AM2016-05-11T00:49:16+5:302016-05-11T00:49:16+5:30
बिड जिल्ह्यातील परळी येथील पप्पू ऊर्फ राकेश रमनलाल चांडक (४५) यांचे साकोली येथून अपहरण झाले की ते बेपत्ता हे अजूनही उलगडले नाही.
अपहरणाचा संशय : पोलिसांसमोर पेच निर्माण
साकोली : बिड जिल्ह्यातील परळी येथील पप्पू ऊर्फ राकेश रमनलाल चांडक (४५) यांचे साकोली येथून अपहरण झाले की ते बेपत्ता हे अजूनही उलगडले नाही. तपास सुरु असला तरी साकोली पोलिसांनी संध्या चांडक यांची बेपत्ता असल्याची नोंद केली आहे. मात्र चांडक यांचे अपहरण करण्यात आले असावे, अशी चर्चा त्यांच्या कुटुंबीयात आहे.
माहितीनुसार, पप्पू ऊर्फ राकेश चांडक यांचा परळी येथे कापसाच्या गाठी विक्रीचा व्यवसाय आहे. ते परळीवरुन दरवर्षी वर्षातून तीन ते चार वेळा गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी येथे लहान भावाकडे कुटुंबीयांसोबत येतात. याही वेळी ते अर्जुनी मोरगावला भावाकडे पाहुणे म्हणून आले व ८ तारखेला सायंकाळी पप्पु आपल्या चारचाकी वाहनाने नागपुरला जाण्यासाठी निघाले. मात्र साकोली येथे आल्यानंतर पप्पूने कार चालकाला कार अर्जुनीला घेऊन जाण्यास सांगून मी बसने नागपूरला जातो असे सांगितले.
मालकाच्या आदेशाप्रमाणे वाहनचालक अर्जूनीला परतला. मात्र तेव्हापासून पप्पू यांचा पत्ताच लागला नाही. त्यांचा भ्रमणध्वनी कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवित असून पप्पू यांचा नातेवाईक व मित्र मंडळीकडे शोध घेतला असता शोध लागला नाही.
त्यामुळे पप्पूचे अपहरण झाले असावे असा दाट संशय त्याच्या कुटुंबीयांना आले तर युग चांडक मृत्यू प्रकरणाशी याही प्रकरणाचा काही संबंध तर नाही याचाही शोध पोलीस घेत आहेत. (तालुका प्रतिनिधी)