महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची अधिकाऱ्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:07 AM2021-03-04T05:07:01+5:302021-03-04T05:07:01+5:30
भंडारा : मोहाडी शाखेच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश गायधने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी वंजारी, ...
भंडारा : मोहाडी शाखेच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश गायधने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी वंजारी, गटशिक्षणाधिकारी विनोद चरपे, शिक्षण विस्तार अधिकारी गभणे यांच्यासोबत गटविकास अधिकारी यांच्या दालनात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
माहे नोव्हेंबर २०१९ पासून मंजूर झालेले वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांची तालुक्याची एकत्रित यादी तयार करून अनुदान मागणी करावी, देयके मंजूर तारखेच्या प्राधान्यक्रमाने काढण्यात यावे, नागसेन फुले यांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्ताव आक्षेप लावून पंचायत समितीला परत करण्यात आले ते प्रकरण गत सात महिन्यांपासून संबंधित शिक्षकाला आक्षेपपूर्तीसाठी प्राप्त झाला नाही तसेच संबंधित लिपिकाकडेही नाही, प्रकरण गहाळ झाले कसे, याबाबत चौकशी करण्यात यावी, आशा किरपाने, रिता मरघडे, फंदू धुर्वे, नरेंद्र उरकुडे यांच्या रजा मंजूर असून त्यांचे थकीत वेतन काढण्यात आलेले नाही. याकरिता अनुदान मागणी करून शिक्षकांचे थकीत वेतन अदा करावे तसेच अर्जित रजा प्रलंबित प्रकरण लवकर निकाली काढण्यात यावे, कोरोना कारणास्तव माहे मार्चमध्ये २५ टक्के वेतन कपात केले होते, ते माहे ऑगस्टमध्ये अदा करण्यात आले. परंतु, जे शिक्षक माहे मार्च ते जुलैला सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे वेतन काढण्यात आले नाही. तशी यादी तयार करून त्यांचे थकीत वेतन काढण्यात यावे, सातवा वेतन आयोग वेतननिश्चिती करण्यात यावे, सेवापुस्तक अद्ययावत करण्यात यावे, सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचे सेवानिवृतीबाबतचे आदेश मुख्याध्यापकांना देण्यात यावे, शिक्षकांची वरिष्ठ, निवडश्रेणी प्रस्ताव जिल्हा परिषदेला सादर करण्यात यावे, प्रमोद मोटघरे यांच्या सेवापुस्तिकामध्ये असलेल्या वेतनवाढीच्या चुका दुरुस्ती करून प्रमाणित करण्यात यावी, शाळेचे विद्युत बिल भरण्यात यावे, जांभोराचे सेवानिवृत्त उच्चश्रेणी मुख्याध्यापक समरीत यांचा सेवानिवृत्तीनंतरचा निवडश्रेणी प्रस्ताव मंजुरीकरिता सादर करावा आदी मागण्यांचा समावेश होता.
विषयसूचीतील सर्व विषय निकाली काढण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी १५ दिवसांचा कालावधी संबंधित विभागाला दिला आहे. प्रलंबित प्रकरण शक्यतेवढ्या लवकर निकाली काढण्याबाबत शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
यावेळी शाखाध्यक्ष अनिल गयगये, विनायक मोथारकर, राधेश्याम आमकर, प्रमोद मोटघरे, किशोर डोकरिमारे, विठ्ठल गभणे, नरेंद्र उरकुडे, संतोष कारेमोरे. जगदीश दिपटे, महादेव कुबडे, वनवासभाऊ धनिष्कर, रामप्रसाद वाघ, डी. एस. हाके, विजय शरणांगत, प्रकाश वैरागडे, वसंत केवट, जयपाल चामट, रामभाऊ बणासुरे, राजूभाऊ बालपांडे, भोजराज अंबादे, बाळा गायधने, सुरेश गडपायले, निशिकांत बडवाईक, नागसेन फुले, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते. शिष्टमंडळाचे सूत्रसंचालन कोमल चव्हाण यांनी केले. तर देवानंद यांनी आभार मानले.