पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने वाहनधारकांमध्ये असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:06 AM2018-04-03T00:06:34+5:302018-04-03T00:06:34+5:30
कमी वेळात झटपट कामे व्हावीत, या हेतूने शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांनी दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी केली आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पेट्रोल डिझेलचे दर सरकारने नियंत्रणमुक्त केल्यापासून बहुतांश वेळा त्यात केवळ वाढच झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कमी वेळात झटपट कामे व्हावीत, या हेतूने शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांनी दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी केली आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पेट्रोल डिझेलचे दर सरकारने नियंत्रणमुक्त केल्यापासून बहुतांश वेळा त्यात केवळ वाढच झाली आहे.
आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी साध्या पेट्रोलचा दर प्रती लिटर ८२.०२ रुपये, पॉवर पेट्रोलचा दर प्रती लिटर ८४.७७ रुपये व डिझेलचा दर प्रती लिटर ६८.२८ रुपये लागू करण्यात आला आहे. पेट्रोल व डिझेलची भरमसाठ दरवाढ झाल्याने सर्वसामान्य व ग्रामीण भागातील वाहनधारकांमध्ये सरकार विरोधात संताप व्यक्त होत आहे.
केंद्र शासनाच्या भारतीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारित सर्व पेट्रोल कंपन्या येतात. वर्षभरात केंद्र शासनाने पेट्रोलच्या भावात अनेकदा वाढ केली आहे. या पेट्रोल दरवाढीविरोधात विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आंदोलने करून शासनाचा निषेध केला होता. मात्र त्यानंतरही केंद्र शासनाची पेट्रोल डिझेलची दरवाढ कायमच आहे. पेट्रोलप्रमाणेच इतर वस्तूंची भाववाढ झाली आहे. पेट्रोलची दरवाढ होत असल्याने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून नव्याने दुचाकी घेणाºया वाहनधारकांचाही दुचाकीबाबतचा कल बदलला आहे. आता अधिकाधिक एवरेज देणाºया गाड्यांची खरेदी होताना दिसून येत आहे. कमी पेट्रोलमध्ये अधिकाधिक अंतर धावणाºया दुचाकी खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे.
ग्रामीण भागात इंधनाची दुपटीने विक्री
बहुतांश ग्रामीण भागात पेट्रोलपंप नाही. त्यामुळे ग्रामीण भागात पेट्रोलचे किरकोळ विक्रेते आता लिटरमागे १०० पेक्षा अधिक पैसे घेत आहेत. ग्रामीण भागातील काही दुकानदार ११० ते १२० रुपये लिटर मागे घेत आहे. ग्रामीण भागात पेट्रोल मिळत नसल्याने वाहनधारकांना पेट्रोल दरवाढीचा फटका सातत्याने सहन करावा लागत आहे.
दररोज सुरु आहे दरवाढ
भंडारा शहरातील एका पेट्रोलपंपावर दरवाढीबाबत विचारणा केली असता, गेल्या काही महिन्यांपासून आता दररोज पेट्रोलच्या भावात पाच ते दहा पैशांची वाढ होत असल्याची माहिती पेट्रोलपंपावरील कामगारांनी दिली. सध्या साधा पेट्रोल ८२.०२ व पॉवरचा पेट्रोल प्रती लिटर ८४.७७ तर डिझेलचे प्रति लिटर दर ६८.२८ रुपये दर सुरू आहे.