राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये २४३ प्रकरणांचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:38 AM2021-09-27T04:38:55+5:302021-09-27T04:38:55+5:30
ग्रामपंचायतीचे एकूण ४११३ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २१७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून ५ लाख ६८ हजार ७ ...
ग्रामपंचायतीचे एकूण ४११३ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २१७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून ५ लाख ६८ हजार ७ रुपये वसूल करण्यात आले. एकूण ५ लाख ७२ हजार ८६० रुपये या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वसूल करण्यात आले. अराष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पॅनल क्रमांक एकवर दिवाणी न्यायाधीश ए. आर. यादव, ॲड. एस. वाय. सुखदेवे, डॉ. भागवत आकरे यांनी काम पाहिले. तर पॅनल क्रमांक दोनवर सह न्यायाधीश एस. एन. पाटील, ॲड. आर. बी. बावणे व वासुदेव रायपूरकर यांनी काम पाहिले. राष्ट्रीय लोकअदालतीसाठी बी. व्ही. गभने. आर. जी. धकाते, व्ही. व्ही. आंबेकर, भुरे, एम. जी. कावळे, गुरुवे, डी. आर. साठवणे, जी. एम. नगरधने, आर. टी. मेश्राम यांनी सहकार्य केले.