रजा राेखीकरणाची प्रकरणे निकाली काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:38 AM2021-08-26T04:38:14+5:302021-08-26T04:38:14+5:30
कर्मचाऱ्यांची सभा मुख्याध्यापक जी. एन. टिचकुले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेत सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे ...
कर्मचाऱ्यांची सभा मुख्याध्यापक जी. एन. टिचकुले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेत सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे रजा राेखीकरणाची प्रकरणे वेतन पथक कार्यालयात प्रलंबित आहेत, ही प्रकरणे त्वरित निकाली काढण्याची मागणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केली आहे. यासोबतच सभेत अंशराशीकरण, थकीत ३ टक्के महागाई भत्ता, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे जीपीएफ, ७ व्या वेतन आयाेगाचा दुसरा टप्पा, ३० जूनला सेवानिवूत्त हाेत असलेल्या कर्मचाऱ्यास एक वेतनवाढ मिळावी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेत चिंतामण यावलकर, रमेश जांगळे, इंद्रजित कुर्झेकर, अर्जुन गाेडबाेले, सुरेश कामथे, विनाेद गाेलीवार, उमेश पडाेळे, चंद्रप्रकाश झाेळे, अरविंद क्षीरसागर, निताराम भिवगडे, पंजाबराव कारेमाेरे, साेविंदा गिऱ्हेपुंजे, तुळशिराम बाेन्द्रे, सुरेश गाेमाशे, मुख्याध्यापक मनाेहर टिचकुले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित हाेते.