सिहोरा येथे दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:10 PM2018-07-17T22:10:00+5:302018-07-17T22:10:15+5:30

Distributed water supply at Sihora | सिहोरा येथे दूषित पाणीपुरवठा

सिहोरा येथे दूषित पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देनद्यांच्या पात्रात गढूळ पाणी : पाण्याचे स्त्रोतही खराब

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा व बावनथडी नद्यांचे खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरातील नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. सुकळी आणि येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद करण्यात आल्याने नागरिकांवर गढूळ पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.
सिहोरा परिसरात असणाऱ्या नद्यांचे पात्रात पुराचे पाणी गढूळ आहे. हे पाणी शुद्धीकरणासाठी सुकळी व येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत. अनेक वर्षापूर्वीपासून सुकळी गावाची योजना रखडली आहे. तर येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना थंडबस्त्यात आहे. सिहोरा गावात एकमात्र ही योजना सुरु आहे. दरम्यान सलग्नीत गावात स्वतंत्र नळ योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. या नळ योजनांना जलशुद्धीकरण केंद्र नाही. यामुळे याच गढूळ पाण्याने नागरिकांना पाण्याची तहान भागवावी लागत आहे. दरम्यान येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद झाली. या योजनेचे अभिनव टाकीत पाणी पुरवठा करण्यासाठी मोहगावचे (खदान) सरपंच उमेश कटरे यांची निर्णय घेत गावागावातच पाण्याचे स्त्रोत निर्माण केले आहे. या नवीन स्त्रोताने गावकऱ्यांना काही महिने मोठा दिलासा मिळाला आहे.
गावात दोन पाणी पुरवठा योजना असल्याने उन्हाळ्यातही पाणी टंचाई जाणवली नाही. परंतु पावसाळा लागताच स्त्रोताचे चित्र गडगडले आहे. या स्त्रोतामधून गढूळ पाणी येत असल्याने गावकरी हैराण झाले आहेत. गावात गावकºयांना काळ्या पाण्याची सजा असे चित्र दिसून येत आहे. गढूळ पाण्याचे झरे सुरु झाल्याने याचा शोध घेतला जात आहे.
परिणामत: गावकºयांना पिण्याचे पाणी बाहेरून आणावे लागत आहे. मोहगाव (खदान) गावात दुषित पाण्याने गावकºयांची झोपच उडाली आहे. नद्यांचे काठावरील पाणी पुरवठा करणाºया योजना मधून पिण्याचे उपलब्ध होत आहेत. गावकरी तथा शाळा व अंगणवाडींनाच याच पाण्याच पुरवठा होत आहे.
बालकांना शुद्ध पाणी पुरवठा व शालेय, आरोग्य परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर यांनी सिहोरा परिसरात आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. अंगणवाडी, शाळा, आरोग्य व गावात पावसाळ्यात आरोग्याची काळजी विषयक, पिण्याचे पाणी आदी विषयावर चर्चा होणार आहे. काही गावात गढूळ पाणी पुरवठ्याचे संकट ओढावले असल्याने या आढावा बैठकीकडे लक्ष लागले आहे.

पावसाळ्यात अंगणवाडी, शाळा व गावात पाण्याचे नियोजन, शुद्ध पाणी, स्वच्छता आदी महत्वपूर्ण आहेत. याकरिता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
-धनेंद्र तुरकर, सभापती, जि.प. भंडारा.
मोहगाव (खदान) गावात पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाण्याचे स्त्रोत आहेत. अचानक या स्त्रोतांना गढूळ पाणी येत असल्याने त्याचा शोध घेतला जात आहे. दोन तीन दिवसात स्थिती सुधारेल.
-उमेश कटरे, सरपंच मोहगाव (ख.)

Web Title: Distributed water supply at Sihora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.