मृतांच्या कुटुंबीयांना धनादेश वितरित

By admin | Published: June 17, 2016 12:38 AM2016-06-17T00:38:57+5:302016-06-17T00:38:57+5:30

तालुक्यातील परसोडी (खापरी) व गुडेगाव येथे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमांच्या कुटुंबीयांना खासदार नाना पटोले यांच्या हस्ते परसोडी खापरी येथे धनादेश वितरित करण्यात आले.

Distribution of checks to the families of the deceased | मृतांच्या कुटुंबीयांना धनादेश वितरित

मृतांच्या कुटुंबीयांना धनादेश वितरित

Next

पवनी : तालुक्यातील परसोडी (खापरी) व गुडेगाव येथे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमांच्या कुटुंबीयांना खासदार नाना पटोले यांच्या हस्ते परसोडी खापरी येथे धनादेश वितरित करण्यात आले.
याप्रसंगी नाना पटोले यांनी नरभक्षक वाघाचा शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करण्यात येईल. उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यातील गावांचे पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले, सरकारने इंग्रजाचे काळातील कायदे बदलले असल्याने प्रकल्पबाधीत गावातील जनतेला जास्तीत जासत मोबदला मिळत असल्याचे सांगितले. नरभक्षक वाघाचा बंदोबस्त होईपर्यंत नागरिकांनी लाठयाकाठ्या हातात घेवून समुहाने शेतावर जावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
याप्रसंगी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जि.प. समाजकल्याण सभापती निलकंठ टेकाम, माजी सभापती हंसा खोब्रागडे, तहसिलदार वासनिक, पं.स. सदस्य मनोहर आकरे, जिल्हा वनक्षेत्राधिकारी (वन्यजीव) भलावी, वनपरिक्षेत्राधिकारी डी. एम. बारई, खापरीच्या सरंपच रेखा रेहपाडे, चिचखेडाच्या सरपंच कुंदा तलमले, भाजपाचे कार्यकर्ते राजेंद्र फुलबांधे, हरिश तलमले, डॉ. संदीप खंगार, राजेश येलशेट्टीवार, सुरेश अवसरे, विवेक अवचट, के. डी. मोटघरे यावेळी उपस्थित होते. मृतक रुपचंद माटे यांच्या पत्नी मनिषा रुपचंद माटे यांना ९० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. घटनेच्या दिवशी १० हजार रुपये तातडीची मदत देण्यात आलेली होती. उर्वरित रक्कम ७ लाख रुपये मुदत ठेवीच्या स्वरुपात देण्यात येणार आहे. गुडेगाव येथील वाघाचे हल्ल्यात जखमी झालेल्या बुध्दम ठवरे यांची पत्नी शालुबाई मुलगा भगवान व ज्योतिष तसेच मुलगी सुकेशिनी यांना ७ लाख रुपयांचे मुदत ठेव प्रमाणपत्र विभागून देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Distribution of checks to the families of the deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.