पोलिसांच्या मदतीने स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:37 AM2021-02-05T08:37:48+5:302021-02-05T08:37:48+5:30
सिहोरा परिसरात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे. बपेरापासून सिहोरापर्यंत अनेक गावांत स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राची निर्मिती ...
सिहोरा परिसरात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे. बपेरापासून सिहोरापर्यंत अनेक गावांत स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. कठाणे बंधूंनी स्पर्धा परीक्षा आणि त्यात असणारे यशाचे गमक सांगितले आहे. महालगावच्या फुले शाहू आंबेडकर अभ्यास केंद्राने अन्य गावांतील तरुणांना प्रेरणेचे बळ मिळाले आहे. बपेरा, गोंडीटोला, सुकली नकुल, रनेरा येथे अभ्यास केंद्र निर्माण झाले आहे. सिहोरा गावात गेल्या अनेक वर्षांपासून युगांधर समूह तरुणाईच्या सुप्त गुणांना उजाळा देण्यासाठी अनेक उपक्रम राबवत आहे. सामान्यज्ञान स्पर्धा, डान्स स्पर्धा आणि स्पर्धा परीक्षा तयारी करणारे व्यासपीठ उपलब्ध केले आहे. राजश्री शाहू महाराज अभ्यास केंद्राची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी विद्यार्थ्यांचे प्रबळ इच्छाशक्तीला साद दिली. युगांधर क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पोलीसभरतीची तयारी करीत असल्याने विद्यार्थिनींना सहकार्य करण्याचे ठरविले. स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्याकरिता योग्य मदत व मार्गदर्शन करणार असल्याची माहिती ठाणेदार नारायण तुरकुंडे यांनी दिली आहे.