पोलिसांच्या मदतीने स्पर्धा परीक्षा पुस्तकाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:42 AM2021-02-05T08:42:08+5:302021-02-05T08:42:08+5:30
चुल्हाड ( सिहोरा ) : ग्रामीण भागातील तरुणांना योग्य मार्गदर्शनाची गरज असून त्यांच्यात ध्येय गाठण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असल्याने उज्ज्वल ...
चुल्हाड ( सिहोरा ) : ग्रामीण भागातील तरुणांना योग्य मार्गदर्शनाची गरज असून त्यांच्यात ध्येय गाठण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असल्याने उज्ज्वल भविष्यकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांचे पुढाकाराने पोलिसांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून युगांधार क्रीडा प्रबोधिनीच्या विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप केले.
सिहोरा परिसरात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. बपेरापासून सिहोरापर्यंत अनेक गावात महापुरुषांचे स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. महालगावच्या फुले शाहू आंबेडकर अभ्यास केंद्राने अन्य गावातील तरुणांना प्रेरणेचे बळ मिळाले आहे. बपेरा, गोंडीटोला, सुकली नकुल, रनेरा अशा गावात अभ्यास केंद्र निर्माण झाले आहे. राजश्री शाहू महाराज अभ्यास केंद्राची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी विद्यार्थ्यांचे प्रबळ इच्छाशक्तीला साद दिली. युगांधार क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीची तयारी करीत असल्याने प्रजासत्ताक दिनी उज्ज्वल भविष्याकरिता विद्यार्थिनींना सहकार्य करण्याचे ठरविले. य सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी या विद्यार्थ्यांना यशोदा पब्लिकेशनच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षाचे पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. गणराज्य दिनी या पुस्तकाचे भेट देण्यात आले.