मविमंतर्फे खते व औषध वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:36 AM2021-02-24T04:36:46+5:302021-02-24T04:36:46+5:30
महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे सबला लोकसंचलित साधन केंद्र, साकोली व झेप लोकसंचलित साधन केंद्र पालांदूर येथे खते व औषध ...
महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे सबला लोकसंचलित साधन केंद्र, साकोली व झेप लोकसंचलित साधन केंद्र पालांदूर येथे खते व औषध वाटप उपक्रम गरजू अल्पभूधारक शेतकऱ्यांकरिता घेण्यात आला. याप्रसंगी विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी केशव पवार, जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर, खत व औषधी पुरवठेदार रमेश पडोळे यांची उपस्थिती होती. साकोली व लाखनी तालुक्यातील महिला बचतगटातील ३९० शेतकरी कुटुंबाला रब्बी हंगामाकरिता धान, टोमॅटो, वांगे पिकाकरिता खते व औषधी देऊन साहाय्य करण्यात आहे. या प्रकल्पांतर्गत एक एकरपर्यंत ४,८०० रुपये एका शेतकऱ्याकरिता बियाणे, खते व औषधीकरिता तरतूद करण्यात आली असून, दोन्ही तालुक्यातील ३९० शेतकऱ्यांना खते व औषधी वाटप करण्यात आले आहेत. यात शेतकऱ्यांचे डेमो प्लॉट तयार केले जाणार असून. या शेतकरी कुटुंबाला बियाणे लागवड, खतांचा वापर याबाबत प्रशिक्षण, शेतकरी अभ्यास दौरे आयोजित केले जाणार आहेत. लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून कृषितज्ज्ञांची नेमणूक करून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करण्याकरिता मार्गदर्शन करून खरीप हंगामाकरिता सहकार्य केले जाणार आहे. कार्यक्रमात साकोली साधन केंद्राच्या अध्यक्षा प्रमिला चांदेवार, सचिव ललिता बागडे, व्यवस्थापक कल्याणी गजभिये, लेखापाल सुनील कापगते, सहयोगिनी ममता बोंबार्डे, कुमुद नंदेश्वर, शशिकला कोवाची, प्रणिता हुमणे, पालांदूरच्या झेप साधन केंद्रच्या अध्यक्षा रोहिणी कोरे, सचिव अर्चना फुंडे, व्यवस्थापक वंदना भिवगडे, लेखापाल धनंजय चौधरी, सहयोगिनी चंद्रप्रभा बावणे, रिता भेंडारकर, मंदा फुलेकर, ज्योती कुंभरे, मंदा फुलेकर, सरिता तिरपुडे उपस्थित होते.