खावटी अनुदान योजनेंतर्गत अन्नधान्य किट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:36 AM2021-07-28T04:36:53+5:302021-07-28T04:36:53+5:30
जिल्हा परिषद सभागृहात मंगळवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रकल्प अधिकारी नीरज एस. मोरे, नगरसेविका गीता सिडाम, आशा ...
जिल्हा परिषद सभागृहात मंगळवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रकल्प अधिकारी नीरज एस. मोरे, नगरसेविका गीता सिडाम, आशा उईके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आमदार भोंडेकर म्हणाले, आदिवासी विभागामार्फत ही चांगली योजना राबविण्यात येत आहे. खावटी अनुदान योजनेच्या माध्यामातून शासनातर्फे होणारी मदत गोरगरीब लाभार्थींना मोलाची ठरणार आहे. खावटी अनुदान योजनेव्यतिरिक्त आदिवासी विभागाच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांचासुध्दा आपण लाभ घ्यावा. गरजू लाभार्थींना घरकुल योजनेचा लाभ द्या, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकेतून मोरे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन लागल्यामुळे गोरगरीब नागरिकांचा रोजगार बुडाला. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या नागरिकांकरिता खावटी अनुदान योजना शासनातर्फे सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये भंडारा जिल्ह्यात एकूण १० हजार ३८४ लाभार्थी पात्र ठरले. खावटी अनुदान योजनेसाठी अद्यापही अर्ज भरणे सुरू असून, गरीब व गरजू लाभार्थींनी अर्ज करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक कमलेश सार्वे यांनी केले. आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी निर्मल झाडे यांनी मानले.