१६६ ग्रामवासीयांना पट्टे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2017 12:25 AM2017-07-12T00:25:58+5:302017-07-12T00:25:58+5:30
तालुक्यातील ढिवरवाडाचे १९६० ला पुनर्वसन झााले, परंतु आवश्यक मुलभुत सोयीसुविधा आजही या गावात पोहचल्या नाही.
वाघमारेंच्या प्रयत्नांना यश : १९६० नंतर प्रथमच गाववासीयांना पट्टे
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : तालुक्यातील ढिवरवाडाचे १९६० ला पुनर्वसन झााले, परंतु आवश्यक मुलभुत सोयीसुविधा आजही या गावात पोहचल्या नाही. ग्रामस्थांना पट्याचे वाटप आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.
पुर्नवसित गावकऱ्यांना स्मशानाची जागा नाही. अजूनही ज्वलंत रुपाने दररोज भेडसावत होते. आमदार चरण वाघमारे यांनी ढिवरवाडा वासीयांच्या समस्या मार्गी लावुन जमिनीचे पट्टे मिळवुन देण्याचे आश्वासन दिले होते, ते आता पूर्ण झााले हे विशेष. पट्टे मिळावे म्हणुन तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव तयार करण्याचे वेगवेगळया बैठकीत विषय मांडून कार्यवाहीस भाग पाडले. तसेच जिल्हा नियोजन समिती असो वा शासनाकडे बैठकीत असो हा विषय गंभीरपणे घेवुन विधीमंडळाचे अधिवेशनात सुध्दा रेटून धरला होता. जो विषय १९६० पासून प्रलंबीत होता. तो विषय चरण वाघमारे यांच्यामुळे मार्गी लागला.
शासकीय अभिलेखानुसार तसेच मौका पंचनामाद्वारे पट्टे वाटपाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. यामुळे १६६ लोकांची अंतीम पट्टे वाटप यादी तयार झााली असुन १६६ लोकांना आ. चरण वाघमारे यांच्या हस्ते ढिवरवाडा गावात पट्टे वाटप करण्यात आले. यांनतरही ९९ लोकांचे गावात अतिक्रमन दिसून आले त्यांना पट्टे वाटप करण्यासाठी योग्य कार्यवाही सुरू केली असून काहींनी दंडाची रक्कम सुध्दा भरली आहे.
या कार्यक्रमात सरपंच भगवान चांदेवार, जि.प. सदस्य निलीमा इलमे, उपसभापती विलास गोबाडे, डॉ. युवराज जमाईवार, जि.प. सदस्य बाबुजी ठवकर, निशीकांत इलमे, विश्वनाथ बांडेबुचे, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले, तहसीलदार मोहाडी सुर्यकांत पाटील, गावकरी व महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.