‘लोकमत सरपंच अवॉर्डस’चे आज होणार थाटात वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:29 PM2018-02-14T22:29:01+5:302018-02-14T22:30:12+5:30
संपूर्ण राज्य आणि भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉडर््स’चे गुरूवार दि.१५ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता साखरकर सभागृह, लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयासमोर, शास्त्री चौक भंडारा येथे वितरण होणार आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : संपूर्ण राज्य आणि भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉडर््स’चे गुरूवार दि.१५ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता साखरकर सभागृह, लाल बहाद्दूर शास्त्री विद्यालयासमोर, शास्त्री चौक भंडारा येथे वितरण होणार आहे.
लोकमत भंडारा जिल्हा कार्यालयात ज्युरी मंडळाच्या बैठकीत भंडारा जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करण्यात आली आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणाºया व त्या स्वप्नांना मूर्तरुप देण्यासाठी झटणाºया मेहनती व कर्तबगार विजेत्या सरपंचांना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
बीकेटी टायर्स हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक, ‘पतंजली आयुर्वेद’ हे प्रायोजक तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत. पहिल्याच वर्षी या पुरस्कारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रचंड चुरस आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. सरपंचांनी गावातील जल व्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी या ११ कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी करून या प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे.