वन्य प्राण्यांच्या हैदोसाने नुकसानग्रस्त लाभार्थ्यांना ५.९७ लाखांचेे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:21 AM2021-07-23T04:21:48+5:302021-07-23T04:21:48+5:30
लाखांदूर : वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे गत २०२० ते २१ या वर्षात तालुक्यात झालेल्या विभीन्न नुकसानांतर्गत सुमारे ५. ९७ लाख ...
लाखांदूर : वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे गत २०२० ते २१ या वर्षात तालुक्यात झालेल्या विभीन्न नुकसानांतर्गत सुमारे ५. ९७ लाख रुपयांचे पीडिताना वाटप करण्यात आले आहे. सदर वाटप अंतर्गत तालुक्यातील १३२ पीडित लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आले असल्याची माहिती वन विभागांतर्गत देण्यात आली आहे.
लाखांदूर तालुक्यात गत २०२० - २१ मध्ये वन्य प्राण्यांतर्गत तालुक्यातील काही भागात लागवडीखालील शेतात पिकांची हानी, पशुधन हानी तर काही ठिकाणी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्याची जखमी हानी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. सदर घटनेच्या स्थानिक लाखांदूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत पंचनामे करून पीडित लाभार्थ्यांना शासन मदत उपलब्ध होण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले होते.
त्यानुसार शासनाने २०२० ते २१ या कालावधीत वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे झालेल्या विविध हानी अंतर्गत तालुक्यातील वन विभागाला सुमारे ५.९७ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. त्यानुसार सदर अनुदानाची रक्कम तालुक्यातील सुमारे १३२ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर नुकसानाच्या आधारावर अनुदान रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.